शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आराेपीला दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा, ठाणे न्यायालयाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 22:04 IST

यावेळी आराेपीच्या शिक्षेसाठी सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी जाेरदार बाजू मांडली...

ठाणे: एका १३ वर्षीय मुलीला िफरायला जाण्याचा बहाणा करुन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या प्रिन्स मिश्रा (२३, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या आराेपीला दहा वर्ष सश्रम कारावासाची तसेच २० हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने सुनावली आहे. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.ठाण्यातील वागळे इस्टेट, किसननगर भागात हा घृणास्पद प्रकार घडला हाेता. मिश्रा याने त्याचा मित्र अक्रम खान (२५, रा. सावरकरनगर, ठाणे) याच्या घरात पिडित मुलीला २ नाेव्हेंबर २०१८ राेजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास गपा मारण्याच्या बहाण्याने रिक्षाने नेले हाेते. तिथे गेल्यानंतर त्याने या मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला हाेता. याप्रकरणी पिडितेच्या आईने श्रीनरग पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर मिश्रा आणि त्याचा मित्र अक्रम या दाेघांनाही तत्कालीन सहायक पाेलीस आयुक्त प्रकाश निलेवाड आणि उपनिरीक्षक आर. एम. गाेसावी यांच्या पथकाने अटक केली हाेती. याच खटल्याची सुनावणी ३ जुलै २०२५ राेजी ठाण्याचे विशेष पाेक्साे न्यायाधीश डी. एस. देशमुख यांच्या न्यायालयात झाली.यावेळी आराेपीच्या शिक्षेसाठी सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी जाेरदार बाजू मांडली. तर वरिष्ठ पेालीस निरीक्षक गुलजारीलाल फडतरे यांच्या पथकाने सर्व साक्षी पुरावे सादर केले. त्याच आधारे आराेपीला दहा वर्षे सक्त मजूरीची िशक्षा सुनावली. यात त्याचा साथीदार अक्रम याची मात्र सबळ पुराव्याअभावी निर्दाेष मुक्तता करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयjailतुरुंग