शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात कोरोनामुळे डेंग्यू आला आटोक्यात, ठामपाने इतर आजार रोखण्यासाठी उचलली पावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 01:39 IST

Thane News : देशात  २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने इतर आजारांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. ठाण्यात दरवर्षी महासभा व स्थायी समितीच्या बैठकीत डेंग्यू आणि मलेरियावर रणसंग्राम होताना दिसून आला आहे.

- अजित मांडकेठाणे :  देशात  २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने इतर आजारांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. ठाण्यात दरवर्षी महासभा व स्थायी समितीच्या बैठकीत डेंग्यू आणि मलेरियावर रणसंग्राम होताना दिसून आला आहे. मात्र, यंदा तशी चर्चाही झाली नसून कोरोनामुळे ठाण्यात डेंग्यूही आटोक्यात आला आहे. २०२० मध्ये शहरात डेंग्यूचे केवळ ७९ रुग्ण सापडले आहेत. २०१९ च्या तुलनेत हे प्रमाण ६० टक्के कमी आढळले आहे.कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्यानंतर स्वच्छता, साफसफाईला अधिक महत्त्व दिले गेले. लॉकडाऊनमुळे शहरात रस्त्याची, इमारतींची कामेही बंद असल्याने पाणी साचण्याची प्रक्रियाही थांबली होती. यामुळे शहरात इतर आजारांचे प्रमाण कमी झाले. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की डेंग्यू, मलेरिया व इतर आजार डोके वर काढतात. डेंग्यूमुळे मृत्यूचे प्रमाणही वाढते. २०२० मध्ये मात्र डेंग्यूवर साधी चर्चाही झालेली नाही. कोरोनाची साथ सुरू असतानाही मनपाने इतर आजार रोखण्यासाठीही घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले.  डेंग्यूचा सर्व्हेठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रत्येक आरोग्य केंद्रनिहाय १०० जणांच्या पथकामार्फत घरोघरी सर्व्हे केला होता. यात ताप, सर्दी, थंडी, खोकला, साथरोग आदींसह मलेरिया, डेंग्यू, लेप्टो या आजारांचाही सर्व्हे झाला. त्यानुसार २७ हजार घरांमध्ये फवारणीही करण्यात आली. तर, शहरातील एक लाखाहून अधिक घरांचा सर्व्हे केल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. डेंग्यूची लक्षणेडेंग्यूच्या लक्षणांमध्ये ताप येणे, थकवा जाणवणे, थंडी वाजणे आदी प्रमुखे लक्षणे दिसून येतात. त्यावेळेस रक्ताची चाचणी केल्यास डेंग्यूचे निदान होते. परंतु,या प्रमुख लक्षणांव्यतिरिक्तक्त इतर काही महत्त्वाची लक्षणे यात आढळत नाहीत. कोरोनामुळे नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व समजले होते. घराची स्वच्छताही केली गेली. त्यामुळेच मागील वर्षी इतर आजारांचे प्रमाण कमी झाले आहे. तरीही महापालिकेने इतर आजारांवर लक्ष दिले. त्यानुसार सर्व्हेदेखील केला होता.- डॉ. राजू मुरुडकर  मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठाणे महापालिका 

टॅग्स :dengueडेंग्यूthaneठाणेHealthआरोग्य