शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे काँग्रेसमधील दुफळी पुन्हा उफाळली, परांजपे यांना पाठिंबा देण्यावरून मतभेद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 04:07 IST

 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली, तरी आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांना पाठिंबा देण्यावरून काँग्रेसच्या दोन गटांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

ठाणे  -  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली, तरी आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांना पाठिंबा देण्यावरून काँग्रेसच्या दोन गटांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.राष्ट्रवादीकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना सतत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम न करण्याची भूमिका घेतली होती. याबाबत, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनीही अहवाल सादर करणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, तो सादर करण्यापूर्वीच पूर्णेकर गटाने शहराध्यक्षांविरोधात भूमिका घेऊन आनंद परांजपे यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केल्याने पक्षामधील गटबाजी अद्याप संपली नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.संपूर्ण देशामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने जातीयवादासह देशातील भ्रष्टाचाराविरु द्ध एक मोठी आघाडी उभी केली आहे. भाजपाची राजकीय मग्रुरी आणि पंतप्रधानांची हुकूमशाही वृत्ती हे दोन्हीही या देशाच्या लोकशाहीला मारक असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. त्यासाठी सर्व समविचारी पक्षांना एकत्र करून हे सरकार उलथवून टाकण्यासाठी राहूल गांधी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत ठाण्यामध्ये शिवसेना व भाजपाला मदतच होईल, अशा पद्धतीने काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी पत्र काढले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांना असहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. ती राहुल गांधी यांच्या विरोधातील भूमिका आहे, असे काँग्रेसच्या पूर्णेकर गटाचे म्हणणे आहे.एकीकडे राहुल गांधी धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही वाचवण्यासाठी विविध पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे व्यक्तिगत हितासाठी काँग्रेसमधील काही अंतर्गत गट शिवसेनेला मदत होईल, अशी भूमिका घेत असल्याचा आरोप पूर्णेकर गटाने केला आहे. या गटाने आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांची नुकतीच भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह ठाणे जिल्हा इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. झिया शेख, जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते महेश पाटील आदी उपस्थित होते.ब्लॉक अध्यक्षांच्या भूमिकेबाबत प्रदेशाध्यक्षांकडे अहवाल सादर करण्यात येणार असून त्या दृष्टीने चर्चा सुरू आहे. मात्र, काही ठरावीक लोकांना फार घाई झाली आहे. जेव्हा सर्व ब्लॉक अध्यक्ष एकमुखाने बोलतात, तेव्हा त्यांचे म्हणणे अध्यक्षांना मानावे लागते. सात ते आठ लोकांच्या पाठिंब्यावर आनंद परांजपे निवडून येत असतील, तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. राष्ट्रवादीने काँग्रेसच्या सात ते आठ लोकांना घेऊन राजकारण करू नये. चर्चेतून मार्ग काढता येईल. स्वीकृत सदस्याच्या मुद्यावर स्वत: गटनेत्यांनी माझे नाव सुचवले होते. जर राष्ट्रवादीचे मनोहर साळवी हे तांत्रिकदृष्ट्या अपात्र झाले असतील, तर दुसरे नाव माझेच येणार, यात शिवसेनेने पाठिंबा देण्याचा संबंधच नाही, हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत.- मनोज शिंदे, शहराध्यक्ष, ठाणे-काँग्रेस

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक