शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याचे आयुक्त जयस्वाल यांनी स्वत:च दिले बदलीचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 02:48 IST

शिवसेनेचे खासदार व आमदार ठाण्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना किमान वर्षाची मुदतवाढ देण्याची मागणी करत असतानाच खुद्द जयस्वाल यांनी मी राज्य शासनाला बदलीची विनंती केल्याचे शुक्रवारी महासभेत जाहीर केले. वर्षअखेरीस राज्य मंत्रिमंडळात होणारे फेरबदल व त्यापाठोपाठ नोकरशहांच्या केल्या जाणाºया बदल्या, यात जयस्वाल यांची बदली होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

ठाणे : शिवसेनेचे खासदार व आमदार ठाण्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना किमान वर्षाची मुदतवाढ देण्याची मागणी करत असतानाच खुद्द जयस्वाल यांनी मी राज्य शासनाला बदलीची विनंती केल्याचे शुक्रवारी महासभेत जाहीर केले. वर्षअखेरीस राज्य मंत्रिमंडळात होणारे फेरबदल व त्यापाठोपाठ नोकरशहांच्या केल्या जाणाºया बदल्या, यात जयस्वाल यांची बदली होण्याची चर्चा सुरू झाली आहे.जयस्वाल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. पालिका निवडणुकीच्या तोंडावर जयस्वाल यांना धमक्या आल्या होत्या. त्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य केले, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जयस्वाल यांना धमक्या आल्या, तर त्यांनी पोलिसात तक्रार देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांना फोन का केला, असा सवाल केला होता.या पार्श्वभूमीवर सध्या जयस्वाल यांना भाजपाच्या नगरसेवकांनी न्यू वंदना सोसायटीच्या टीडीआरवरून घेरले आहे. त्यातच आयुक्तांविरोधात व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमुळे ते व्यथित आहेत. प्रशासकीय प्रमुख म्हणून मी कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतले. मात्र, काही लोकांनी वैयक्तिक टीका केल्याची खंत वाटते, असे सांगत आपल्या दीर्घ भाषणामध्ये त्यांनी लोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्यातील संघर्षाच्या आठवणी उगाळून लोकप्रतिनिधींचे आभार मानले. कदाचित, ही माझी शेवटची महासभा असावी, असेही ते म्हणाले.तांत्रिक बाबींमुळे काही नगरसेवकांचे पद रद्द झाले. ती कायद्याची प्रक्रिया होती. काही लोकांनी ही कार्यवाही वैयक्तिक स्वरूपात घेतली. त्यामुळे मी गेली तीन वर्षे शहराचा विकास केला असून आता ठाणेकरांमध्ये माझे रिपोर्टकार्ड तयार आहे. ते किती सच्चे आहे, याची मी येथून गेल्यावर सर्वांना प्रचीती येईल, असे भावनिक उद्गारदेखील आयुक्तांनी काढले. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

बड्या अधिका-यांच्या बदल्या अनिवार्य-राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार व फेरबदल २६ डिसेंबरला होणार असल्याचे समजते. त्याच सुमारास विद्यमान मुख्य सचिव सुमित मलिक यांना पदावरून दूर करून त्या जागी डी.के. जैन यांची नियुक्ती होईल, अशी चर्चा आहे. मलिक यांची राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती अपेक्षित आहे. त्यानंतर, लागलीच नोकरशाहीत बडे फेरबदल अपेक्षित आहेत. त्यामध्ये जयस्वाल यांचीही बदली होईल, असे समजते. जयस्वाल हे मुख्यमंत्री कार्यालय अथवा मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास अ‍ॅथॉरिटीमध्ये नियुक्तीकरिता इच्छुक आहेत. यापैकी एका ठिकाणी त्यांची नियुक्ती होईल किंवा सिडको अथवा वित्त खात्यात जयस्वाल नियुक्त होतील, अशी मंत्रालयातील उच्चपदस्थ नोकरशहांमध्ये चर्चा आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका