शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

शहापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मध्यरात्री धडकले ठाणे जिल्हाधिकारी, ZP सीईओ

By सुरेश लोखंडे | Updated: October 6, 2023 14:27 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार नवी दिल्ली येथून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून राज्यातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला होता

ठाणे - मध्यरात्री ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन तेथील आरोग्य यंत्रणेची भंबेरी ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल (सीईओ) यांनी गुरुवारी उडवली. अचानक टाकलेल्या या धाडीत या पथकाने आरोग्य केंद्रातील डाँक्टर, कर्मचारी आदींची शहानिशा करून औषधी साठा, साहित्य,साधनांची पाहणी केली.

जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करून सद्य:स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या सूचनेनुसार जिल्हाधिकारी, सीईओ यांचे संयुक्त पथक मध्यरात्री शहापूर या दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांवर धडकले आणि त्यांनी वस्तुस्थितीचा आढावा घेत अहवाल तयार कलण्यास प्रारंभ केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार नवी दिल्ली येथून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून राज्यातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला होता. यापुढे जिल्हाधिकाऱ्यांनी नियमितपणे शासकीय रुग्णालयांना भेटी देण्याच्या स्पष्ट सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी, सीईओ व जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ.गंगाधर परगे यांच्यासोबत शहापूर तालुक्यातील डोळखांब प्राथमिक आरोग्य केंद्रास मध्यरात्री साडेबारा वाजता अचानक भेट दिली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. पटेल यांच्यासह नर्स व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. या आरोग्य केंद्रात रात्री दहा वाजता एका महिलेची प्रसूती झाल्याचे वास्तव ही त्यांनी नोंद केले आहे.    

जिल्हाधिकारी शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल यांनी या महिलेच्या नातेवाईकांची आस्थेवाईकपणे चौकशी करून मातेला व बाळाला योग्य त्या सुविधा, औषधोपचार मिळाले आहेत का याची माहिती घेतली. तसेच या आरोग्य केंद्रातील प्रसूती कक्ष, वैद्यकीय अधिकारी यांचे कक्ष, औषध भांडार, रुग्ण कक्ष यांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यानंतर रात्री दीड वाजता जिल्हाधिकारी व सीईओ यांनी टाकी पठार या अतिदुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. या केंद्रातील ऑपरेशन थिएटर, रुग्ण कक्ष, येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची सोय आहे का, पुरेशी औषधे आहेत का याची चौकशी करून खातरजमाही केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव यांनी रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा असल्याची माहिती दिली. 

आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही नागरिकांना परत पाठवू नये, त्यांना आवश्यक असणारे उपचार व औषधे तातडीने उपलब्ध करून देण्याची दक्षता आरोग्य अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी व सीईओ जिंदल यांनी दिल्या.  आरोग्य केंद्रात पुरेसा पाणी व वीज पुरवठा करण्याची सूचनाही त्यांनी केली. राज्य सरकारचे आरोग्य व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य आहे. दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः जातीने लक्ष देत आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी सतर्क राहून रुग्णांची सेवा करावी, प्रत्येक आरोग्य केंद्रातील औषध साठा पुरेसा आहे, याची खात्री करावी, औषध साठा संपण्यापूर्वी पुरेशा वेळेत त्याचा अंदाज घेऊन आवश्यक औषध साठा वेळेत उपलब्ध होईल, याची खात्री बाळगावी, औषध साठ्याची माहिती ई-सुश्रुत किंवा ई-औषधी या पोर्टलवर वेळोवेळी अपलोड करावी, आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचीही आस्थेने चौकशी करून दाखल रुग्णावर तातडीने आवश्यक व योग्य औषधोपचार करावेत, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी त्याचबरोबर रुग्णालय व रुग्णालयाचा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवावा, असेही जिल्हाधिकार्यांनी यावेळी सांगितले.