शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे : मंत्रिपदाकरिता जिल्ह्यात रस्सीखेच, पालकमंत्रिपदावर भाजप करणार दावा?

By संदीप प्रधान | Updated: July 10, 2022 11:34 IST

पालकत्व डोंबिवली की नवी मुंबईकडे?

संदीप प्रधान / अजित मांडकेठाणे  : एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याने ठाणे जिल्ह्याला किती मंत्रिपदे मिळणार व जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार, याची चर्चा सुरू झाली आहे. गणेश नाईक, रवींद्र चव्हाण व बालाजी किणीकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पालकमंत्रिपद भाजप आपल्याकडे राखण्याचा आग्रह धरील, अशी चर्चा आहे. तसे झाल्यास रवींद्र चव्हाण हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होऊ शकतात, असे बोलले जाते.

ठाणे जिल्ह्याकडे मुख्यमंत्रिपद असल्याने मंत्रिमंडळ तयार करताना प्रादेशिक समतोल साधताना ठाण्याला दोन कॅबिनेट व दोन राज्यमंत्रिपदे मिळतील, अशी चर्चा आहे. गणेश नाईक यांना ज्येष्ठ नेते म्हणून मंत्रिमंडळात भाजपला संधी द्यावी लागेल. याखेरीज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय रवींद्र चव्हाण यांचाही मंत्रिमंडळात समावेश होईल, असे समजते. शिंदे हे बालाजी किणीकर या आपल्या समर्थकाला राज्यमंत्रिपद मिळावे याकरिता प्रयत्न करतील. किणीकर हे वैद्यकीय पेशातील असल्याने आरोग्य राज्यमंत्री म्हणून त्यांचा समावेश केला जाऊ शकतो.

भाजपमधील ज्येष्ठ आमदार किसन कथोरे यांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. परंतु त्यांचा समावेश होईल किंवा कसे याबाबत मतमतांतरे आहेत. भाजपमधील केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासोबत त्यांचा संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे. संजय केळकर (भाजप) व प्रताप सरनाईक (शिवसेना) हेही मंत्रिमंडळ समावेशाकरिता प्रयत्नशील आहेत. केळकर हे ठाण्यातील भाजपचा चेहरा आहेत. निष्ठावंत आहेत. भाजपमध्ये आयारामांची चलती असल्याचा आरोप खोडून काढायचा असेल तर केळकर यांचा समावेश केला जाईल, असे पक्षात बोलले जाते. सरनाईक यांना लागलीच राज्यमंत्रिपद दिले जाते की, कालांतराने महामंडळ दिले जाते याचे कुतूहल आहे.

काँग्रेसच्या काळात नाईकांनी भूषवले पदठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाकडे जाणार याचे कुतूहल आहे. मुख्यमंत्रीपद शिंदे यांच्याकडे असल्याने ते आपल्या एखाद्या खास मंत्र्याला ठाण्याचे पालकमंत्री करून जिल्ह्यावरील पकड घट्ट ठेवतील. मात्र दिल्लीतील भाजपचे चाणाक्य ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भाजपकडे सोपवण्याची अट शिंदे यांच्यापुढे ठेवू शकतात. तसे झाल्यास शिंदे व फडणवीस या दोघांनाही जवळ असलेले रवींद्र चव्हाण यांच्याकडे पालकमंत्रिपद येऊ शकते. मात्र दिल्लीला भाजपमधील अधिक वजनदार नेता पालकमंत्री हवा असल्यास गणेश नाईक यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाऊ शकते. यापूर्वी दोन्ही काँग्रेसचे सरकार सत्तेत असताना नाईक हे पालकमंत्री होते. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारणGanesh Naikगणेश नाईक