शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पाचही तालुक्यांची कोरोना मुक्तीकडे वाटचाल, १८४ ग्रामपंचायतींत कोरोनाचा शिरकावच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 07:40 IST

  ग्रामीण भागात कोरोनाचे पहिले रुग्ण गुरवली व बोरिवली गावात ३१ मार्च २०२० ला सापडले होते. मात्र, १८४ ग्रामपंचायतींमध्ये अजूनही रोनाने शिरकाव केलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १८,९७८ कोरोनारुग्ण सापडल्याची नोंद आहे. यातील आतापर्यंत ५८३ जणांचा मृत्यू झाला आहे. 

सुरेश लाेखंडे -

ठाणे :  जिल्ह्यातील  भिवंडी, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ आणि कल्याण या  तालुक्यांतील गावांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. आता दिवसाकाठी बोटांवर मोजण्याइतके बाधित आढळून येत आहेत, तर मृतांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात घटत असून, काही दिवसांच्या अंतराने एखाद्‌दुसरे मृत्यू होत आहे.  ग्रामीण भागात कोरोनाचे पहिले रुग्ण गुरवली व बोरिवली गावात ३१ मार्च २०२० ला सापडले होते. मात्र, १८४ ग्रामपंचायतींमध्ये अजूनही रोनाने शिरकाव केलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १८,९७८ कोरोनारुग्ण सापडल्याची नोंद आहे. यातील आतापर्यंत ५८३ जणांचा मृत्यू झाला आहे.    ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेने आरोग्य अधिकारी मनीष रेंघे व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी अर्चना देशमुख आदींच्या मार्गदर्शनाखाली २८ हजार ७४७ कोरोना चाचण्या केलेल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ९५.५९ टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे.

गावांपेक्षा शहरांमध्ये रुग्ण अधिक -जिल्ह्यात सद्यस्थितीपर्यंत दोन लाख ४८ हजार ८०९ रुग्ण बाधित झाल्याची नोंद आहे. यातील सर्वाधिक शहरांमध्ये दोन लाख २९ हजार ८३१ रुग्ण बाधित आहेत. जिल्ह्यातील शहरी भागात पाच हजार ४६४ मृत्यूंची नोंद झाली आहे, तर गावपाड्यांमध्ये केवळ ५८३ जण दगावलेले आहेत. या रुग्णसंख्येपैकी गावपाड्यांमधील १८ हजार ९४ रुग्ण या कोरोनाच्या महामारीतून वाचवण्यात ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांना यश आले आहे. शहरी व ग्रामीण भागात कोरोनासदृश लक्षणे आढळलेल्या १० लाख ७५ हजार ५९५ जणांपैकी तपासणीअंति आठ लाख ७५ हजारांपेक्षा अधिक निगेटिव्ह आले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याthaneठाणे