शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Thane: जि.प.कडून १५१ अतिरिक्त पदविधर शिक्षकांचे उपशिक्षक म्हणून समायाेजन!

By सुरेश लोखंडे | Updated: August 26, 2023 19:37 IST

Thane: ठाणे जिल्ह्यातील गांवपाड्यांमधील प्राथमिक शाळेचे तब्बल १५१ शिक्षक संचमान्यतेव्दारे अतिरिक्त ठरले आहेत.

ठाणे - जिल्ह्यातील गांवपाड्यांमधील प्राथमिक शाळेचे तब्बल १५१ शिक्षक संचमान्यतेव्दारे अतिरिक्त ठरले आहेत. त्यांना समावून घेण्याची गरज लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषदेने येथील एम. एच हायस्कूल येथे शुक्रवारी उशिरापर्यंत त्यांचे समुपदेशन करून विविध शाळांमधील रिक्त जागी अखेर त्यांचे समायाेजन करण्यात आले आहे. या पदविधर शिक्षकांना आता उपशिक्षक म्हणून नियुक्ती आदेश जारी झाले आहेत.

जिल्हह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात ठाणे जिल्हा परिषदेच्या एक हजार ३२८ प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. त्यामध्ये ८१ हजार ७०० पेक्षा अधीक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. समाजशास्त्र विषयास अनुसरून २०१४ मध्ये या पदवीधर शिक्षकांची नियुक्ती जिल्हा परिषदेने केली हाेती. मात्र २०२२-२३ च्या संचमान्यतेतून हा समाजशास्त्र विषय वगळण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याभरातील शाळांमधील हे १५१ शिक्षक अतिरिक्त ठरले हाेते. िजिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये शिक्षकांची गरज आहे, अशा शाळांचा शाेध घेऊन त्या जागी या शिक्षकांचे समायाेजन करण्यात आले.

जिल्ह्यातील विविध शाळांवर पदवीधर शिक्षक म्हणून या शिक्षकांनी नऊ वषेर् विद्यार्थ्यांना शिकवले आहे. मात्र या पदविधर शिक्षकाना  आता उपशिक्षक म्हणून शाळांवर नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यात तीव्र असंताेष आहे. एम.एच हायस्कूलच्या सभागृहात या शिक्षकांचे समायाेजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे आणि शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिक्षकांचे समुपदशेन करून त्यांची रिक्त जागी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी मात्र शिक्षकांनी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण त्यास प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :Teacherशिक्षकthaneठाणे