शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

कोकणासाठी ठाण्यातून ९२० बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 03:42 IST

गणेशोत्सवासाठी ६८४ गाड्या बुक; ग्रुप बुकिंगकडे कल, ११ सप्टेंबरला सुटणार सर्वाधिक गाड्या

- पंकज रोडेकरठाणे : गणेशोत्सव म्हणजे चाकरमान्यांसाठी जणू एक पर्वणीच असते. कोकणात बाप्पांच्या स्वागतासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे यावर्षी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने ९२० एसटी बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यापैकी जवळपास ६८४ बसेस आजघडीला हाउसफुल्ल झाल्या आहेत. तर, सर्वाधिक बसेस ठाण्याच्या खोपट डेपोतून सोडल्या जाणार आहेत. ज्या चार डेपोंतून बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे, त्यामध्ये सध्यातरी ११ सप्टेंबरला सर्वाधिक ४३५ बसेस बुक झालेल्या आहेत. व्यक्तिश: बुकिंगपेक्षा ग्रुप बुकिंग करण्याकडे चाकरमान्यांचा कल दिसून येत आहे.यंदा गणेशचतुर्थी १३ सप्टेंबर रोजी असून त्यानिमित्त कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांची तयारी सुरू झाली आहे. कोकणात जाण्यासाठी एसटीच्या ठाणे विभागाने यंदा ९२० बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. मात्र, आवश्यकता भासल्यास जादा बसेस सोडण्याची तयारी करून ठेवल्याचेही विभागाकडून सांगण्यात आले. ठाणे विभागातील चार डेपोंतून ८ ते १२ सप्टेंबरदरम्यान जादा फेºया सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांचे संगणकीय आरक्षण एक महिना अगोदरपासून उपलब्ध करून दिले आहे.ग्रुप पद्धतीचे आरक्षण ४० दिवस आधी सुरू झाले असून त्यासाठी आगार व्यवस्थापकांकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते. परतीच्या आरक्षणाची व्यवस्थाही तत्काळ उपलब्ध करून दिली असून परतीचा प्रवास हा १८ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार असल्याची माहिती विभागाने दिली.दोन दिवस आधी खरी कसरत११ सप्टेंबर रोजी सध्या ४३५ बसेस बुक आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दिवसात विशेष आॅपरेशन एसटी विभागामार्फत राबवले जाते. बसमध्ये जागा बुक केलेल्या चाकरमान्याला त्याच्या बसपर्यंत सहज पोहोचता यावे, हा त्यामागचा उद्देश असतो.त्यामुळे यादिवशी कर्मचाºयांची प्रचंड धावपळ उडते. गणेशोत्सवाच्या काळात जनरल आणि गणपतीसाठी सोडण्यात येणाºया गाड्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाते. त्यामुळे या गाड्यांशी नियमित गाड्यांचा संबंध येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.यादिवशी सर्वाधिक ४३५ बसेसकोकणात जाण्यासाठी ८ ते १२ सप्टेंबर असे पाच दिवस जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. ८ सप्टेंबरला शनिवार असून त्यादिवशी अवघ्या तीन जादा बसेस सुटणार आहेत. ९ सप्टेंबरला २४, १० रोजी ११३, १२ सप्टेंबर रोजी १०९, तर ११ सप्टेंबर रोजी सर्वाधिक ४३५ एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत.ग्रुपद्वारे ३१४ बसेस फुल्ल : चाकरमान्यांचा ग्रुप बुकिंग करण्याकडे जास्त कल असल्याचे दिसून येते. ३० जुलैपासून आतापर्यंत ग्रुपने ३१४ बसेस बुकिंग केल्या आहेत. हे बुकिंग करण्यात राजकीय मंडळींचा भरणा अधिक आहे. ग्रुप बुकिंग असल्याने त्यांना एसटी डेपोमध्ये येण्याची गरज नसते. ग्रुपने निश्चित केलेल्या ठिकाणापासून बस थेट गावात नेली जाते.रत्नागिरीकर आघाडीवर : बाप्पांच्या आगमनासाठी गाड्यांचे सर्वाधिक बुकिंग करणाºयांमध्ये रत्नागिरीकर आघाडीवर आहेत. त्यापाठोपाठ दापोली, गुहाघर, चिपळूण आणि खेड येथील चाकरमानी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.गणेशोत्सवात कोकणात जाणाºया प्रवाशांची संख्या ठाणे आणि मुंबईतून जास्त आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा जवळपास १०० बसेस जास्त सोडण्याचे नियोजन के ले आहे. शेवटच्या दिवसात कोकणात जाण्यासाठी गर्दी वाढल्यास आणखी बसेस सोडण्याचीही तयारी आहे. गणेशोत्सवात गावी जाणाºयांना त्रास होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे.- शैलेश चव्हाण, विभागीय नियंत्रक, ठाणे परिवहन विभागग्रुप बुकिंगला यंदाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या बसेसमध्ये आणखी चार किंवा पाच जणांना घेऊन जायची वेळ आली, तर त्यांना स्वतंत्र तिकीट घ्यावे लागेल. व्यक्तिगत बुकिंगच्या बसेस जवळपास फुल्ल होत आल्या आहेत.- आर.एच. बांदल, वाहतूक अधिकारी, ठाणे परिवहन विभाग

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळkonkanकोकणthaneठाणे