शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

ठाण्यात १५ रुग्णालये सील, महापालिकेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 06:34 IST

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सक्षम अग्निसुरक्षा यंत्रणा नसलेल्या १५ रुग्णालयांना ठामपा अग्निशमन दलाने सील ठोकले असून आरोग्य विभागाने त्यांची नोंदणीही रद्द केली आहे.

ठाणे : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सक्षम अग्निसुरक्षा यंत्रणा नसलेल्या १५ रुग्णालयांना ठामपा अग्निशमन दलाने सील ठोकले असून आरोग्य विभागाने त्यांची नोंदणीही रद्द केली आहे. यामध्ये वागळे इस्टेट परिसरातील सर्वाधिक पाच रुग्णालयांचा समावेश आहे.अग्निशमनदलाचे ना हरकत प्रमाणपत्र नसणाऱ्या रु ग्णालयांवर कारवाईचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार ठामपा अग्निशमन दलाने संबंधित रुग्णालयांना ४८ तासांची नोटीस बजावून मंगळवारी आणि बुधवारी ही कारवाई केली.ठाणे महानगरपालिका हद्दीत केवळ १८३ रु ग्णालयांतच अग्निसुरक्षा यंत्रणा सक्षम असल्याचे उघड झाले होते. अग्निशमन दलाने ३१ डिसेंबरपर्यंत त्यांना अग्निसुरक्षा यंत्रणा अद्ययावत करून तपासणीसाठी अर्ज सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार अग्निशामक दलाने काहींची तपासणी करून त्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले. परंतु, इतर रु ग्णालयांनी मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवली होती. त्यामुळे येथे उपचार घेणाºया रु ग्ण आणि कामाला असणाºया कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाºयावर असल्याचे उघड झाले होते. आजही या रुग्णालयांमध्ये हजारो रु ग्णांवर उपचार केले जात असून तेथील शेकडो कर्मचाºयांच्या सुरक्षेचाही प्रश्न कायम आहे.यामुळे एप्रिल २०१८ मध्ये सपन श्रीवास्तव यांनी ठामपा हद्दीत अनेक रु ग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसविल्याचा आरोप करून मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. यावरील सुनावणीत न्यायाधीश नरेश पाटील आणि अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाने ठाण्यातील रूग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेची पाहणी करून याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. Þत्यानंतर पालिकेने अग्निसुरक्षा यंत्रणा प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र आदींबाबत या खाजगी रु ग्णालयांना नोटिसा बजावल्या होत्या. दरम्यानच्या काळात मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत ७० रुग्णालयांकडे अग्निशमनदलाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना टाळे ठोकण्याचे आदेश दिले होते.न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईन्यायालयाच्या निर्देशानुसार ३ मे रोजी रुग्णालयांना ४८ तासांच्या नोटिसा बजावल्या. ६ मेला ४८ तास पूर्ण झाल्यानंतर ७ व ८ मे रोजी १५ रुग्णालयांना सील ठोकले. तसेच ठामपा आरोग्य विभागाने या रुग्णालयांची नोंदणीही रद्द केली. सील ठोकलेल्या रुग्णालयांमध्ये वागळे इस्टेट येथील ५, मुंब्रा-कौसा - ४ आणि बाळकूम तसेच नौपाडा या परिसरातील प्रत्येकी तीन रुग्णालयांचा समावेश असल्याची माहिती ठामपा अग्निशमन दलाचे प्रमुख शशिकांत काळे यांनी दिली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMumbaiमुंबई