शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

ठाण्यातील कलादालनात शांतिनिकेतनच्या कलाकृती! 2० सप्टेंबरला 'आर्ट प्रिव्हिलेज'मध्ये प्रदर्शनाचे उदघाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 15:11 IST

चित्रकलेतील ‘प्रिंट मेंकिंग’ या कलाप्रकारात काम करणाऱ्या  कलावंतांना प्रेरणा देण्यासाठी, नव्या-जुन्या कलावंतांशी संवाद साधण्यासाठी ठाण्यातील आर्ट प्रिव्हिलेज हे कलादालन गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करीत आहे.

ठाणे, दि. 18 - चित्रकलेतील ‘प्रिंट मेंकिंग’ या कलाप्रकारात काम करणाऱ्या  कलावंतांना प्रेरणा देण्यासाठी, नव्या-जुन्या कलावंतांशी संवाद साधण्यासाठी ठाण्यातील आर्ट प्रिव्हिलेज हे कलादालन गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करीत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जगप्रसिद्ध शांतीनिकेतन या रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन 2० सप्टेंबर 2०17पासून ‘आर्ट प्रिव्हिलेज, 5, श्री शांता निवास, कर्वे हॉस्पिटलच्या समोर, ब्राम्हण सोसायटी ठाणे  (प.) येथे भरवीले आहे अशी माहिती आर्ट प्रिव्हिलेज गॅलरीचे प्रमुख आणि या उपक्रमाचे समन्वयक प्रीतम देऊस्कर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

हे प्रदर्शन  30 ऑक्टोबरपर्यंत  सुरू राहणार असून, रसिकांना ते नि:शुल्क बघता येणार आहे. या प्रदर्शनात शांतीनिकेतनच्या 18 प्रिंटमेकर्सने साकारलेल्या कलाकृती सादर करण्यात येणार असून, याच उपक्रमाचा एक भाग म्हणून शांतीनिकेतनचे 11 विद्यार्थी प्रदर्शनकाळात काही कलाकृतींची निर्मितीही करणार आहेत. शांतीनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी  ठाण्यातील कलादालनात येऊन, त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवणे  आणि प्रिंटमेंकिंग करणे हे आम्हा कलावंतांसाठी आनंदाचा, उत्साहाचा आणि प्रेरणादायी प्रसंग आहे असे देऊस्कर यांनी सांगितले. 

शांतीनिकेतनच्या विद्यार्थ्यांची  निवासी कार्यशाळा 20 ते 25 सप्टेंबर दरम्यान होणार असून, ज्या अभ्यासकांना ही कलानिर्मिती होताना पाहायची असेल, त्यांच्याशी संवाद साधायचा असल्यास पूर्वसूचना देऊन सहभागी होता येईल, असे त्यांनी कळविले आहे.ठाण्यातील आर्ट प्रिव्हिलेज कलादालनात ज्येष्ठ कलावंतांसोबत उदयनोन्मुख कलावंतांचा संवाद होण्याचा उपक्रम काही दिवसांपासून सुरू झाला. फक्त चित्रांचे प्रदर्शन नव्हे तर चित्रांवर चर्चा व्हावी, त्यातून नव्या कलावंतांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमाचे हे महत्त्वाचे पुष्प 2० सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता गुंफले जाणार असून,  प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध आर्किटेक चंद्रशेखर कानेटकर आणि सुप्रसिद्ध प्रिंटमेकर विलास शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.