शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

ठाणेकरांचाही अपेक्षाभंगच ?

By admin | Updated: March 30, 2017 06:41 IST

बृहन्मुंबईतील ५०० चौ.फू. क्षेत्रफळाच्या सदनिकाधारकांना मालमत्ताकरात माफी देण्याच्या वचननाम्यातील घोषणेपासून

ठाणे : बृहन्मुंबईतील ५०० चौ.फू. क्षेत्रफळाच्या सदनिकाधारकांना मालमत्ताकरात माफी देण्याच्या वचननाम्यातील घोषणेपासून शिवसेनेने घूमजाव केल्याने त्याच धर्तीवर ठाणेकरांनाही सवलत मिळण्याची शक्यता मावळली आहे. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे आगामी वर्षीचा अर्थसंकल्प सादर करतील, मात्र त्यामध्ये वचननाम्यातील लोकानुनयी घोषणांचा अंतर्भाव नसेल, असे संकेत प्राप्त होत आहेत.बृहन्मुंबईत ५०० चौ.फू. क्षेत्रफळाच्या सदनिकाधारकांना मालमत्ताकरात संपूर्ण माफी, तर ५०० ते ७०० चौ.फू. क्षेत्रफळाच्या सदनिकाधारकांना मालमत्ताकरात सवलत देण्याची घोषणा शिवसेनेने वचननाम्यात केली होती. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात ती घोषणा बृहन्मुंबईत लागू होणे अपेक्षित होते. मात्र, त्याचा समावेश आयुक्तांनी केलेला नाही. ठाण्यातही ५०० चौ.फू. क्षेत्रफळाच्या सदनिकाधारकांना मालमत्ताकरात सवलत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मुंबईतच घोषणा हवेत विरली, तर ठाण्यात तिची अंमलबजावणी होण्याची चिन्हे अत्यंत धूसर आहेत. मुंबईकरांपेक्षा ठाणेकरांनी यावेळच्या निवडणुकीत सेनेला भरभरून मते दिली. आतापर्यंत शिवसेनेला कधीही ठामपात न मिळालेले बहुमत प्राप्त झाले असल्याने आता ठाणेकरांच्या ऋणातून शिवसेना कशी उतराई होणार, असा सवाल केला जात आहे.निवडणुकांमुळे लांबलेल्या ठाणे महापालिकेच्या आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पास अखेर मुहूर्त मिळाला असून गुरु वारी सकाळी आयुक्त संजीव जयस्वाल तो सर्वसाधारण सभेपुढे सादर करतील. सरकारने करवसुलीचे १०० टक्के उद्दिष्ट गाठण्याची तंबी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना दिली आहे. ठाणे महापालिकेस राज्य सरकारच्या आदेशांची किती अंमलबजावणी करता आली आहे, हेदेखील स्पष्ट होणार आहे. अर्थसंकल्पात शहराचा पुढील पाच वर्षांच्या विकासाचा आराखडा सादर केला जाण्याची शक्यता असून करसवलतींबरोबरच करवाढीची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे. मनपा निवडणुकीत शिवसेनेने घोषणांचा पाऊस पाडला होता. या घोषणांच्या पूर्ततेसाठी अर्थसंकल्पात किती ठोस पावले उचलली, हे उद्याच स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)गेल्या वर्षभरात शहरात रस्ते रुंदीकरण कामाचा धडाका अभियांत्रिकी विभागाने लावला आहे. याशिवाय, कळवा येथील चौपाटी प्रकल्पाची आखणी महापालिकेने केली असून येत्या काळात यासाठीची निविदा प्रक्रि या पूर्ण केली जाणार आहे. महापालिका निवडणुकीनंतर जयस्वाल यांच्या बदलीची चर्चा जोरात सुरू झाली आहे. शेजारील नवी मुंबई महापालिकेचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांची एसटी महामंडळात अलीकडेच बदली केली गेली.ही पार्श्वभूमी पाहता जयस्वाल यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या अंमलबजावणीचे हे वर्ष असल्याने राज्य सरकार त्यांना प्रकल्प साकारण्याची संधी देते की, त्यापूर्वीच त्यांची बदली होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.ठामपा आयुक्त म्हणून जयस्वाल यांचा हा तिसरा अर्थसंकल्प. गेल्यावर्षी आखलेले महत्त्वाचे प्रकल्प प्रगतीपथावर अथवा निविदा प्रक्रि येत असल्याने आणखी कोणत्या नव्या प्रकल्पांचा समावेश केला जातो, याविषयी उत्सुकता आहे.