शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

ठामपाचे सहायक आयुक्त सुनील मोरे निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 00:54 IST

आयुक्तांनी केली कारवाई : दिवा प्रभाग समितीमधील फाइलचोरी भोवली

ठाणे : दिवा प्रभाग समिती कार्यालयातून संगणक आणि महत्त्वाच्या फाइल्स चोरी प्रकरणात अडकलेले तत्कालीन सहायक आयुक्त डॉ. सुनील मोरे यांच्यावर बुधवारी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिनकुमार शर्मा यांनी कारवाईचा बडगा उगारून त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. मोरे यांच्यासह फिरोज खान या दोघांवर शीळ-डायघर पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे.

ठाणे महापालिकेच्या वतीने दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त महेश आहेर यांनी डॉ. सुनील मोरे यांच्यावर कलम ३८० (चोरी), ४०९, (सरकारी मालमत्ता चोरणे) तसेच ३४ (गुन्हेगारी संगनमत) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. महापालिकेतील सहायक आयुक्तांच्या ज्या दिवशी बदल्या झाल्या, त्याच दिवशी रात्री संगणक आणि फाइल चोरीला गेल्या होत्या. यावेळी दिवा प्रभाग समितीच्या कार्यालयात सहायक आयुक्तमोरे आल्याची नोंद सुरक्षारक्षकांनी केली होती. आयुक्तांनी १७ आॅगस्ट रोजी संध्याकाळी उशिरा सहायक आयुक्तांच्या बदल्या केल्या होत्या. यामध्ये मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त महेश आहेर यांची दिवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तपदी तर दिवा प्रभाग समितीचे सहायक मोरे यांची निवडणूक विभागात बदली केली होती. मात्र, ज्या दिवशी या बदल्या झाल्या, त्याच दिवशी रात्री उशिरा दिवा प्रभाग समिती कार्यालयातील संगणक आणिकाही महत्त्वाच्या फाइल चोरीलागेल्या होत्या.मोरे रात्री आले होते कार्यालयातठाणे महापालिका मुख्यालयातून दोन संगणक दिवा प्रभाग समितीच्या कार्यालयात तत्कालीन सहायक आयुक्त डॉ. सुनील मोरे यांच्या मागणीनुसार मागवण्यात आले होते. प्रभाग समितीच्या सुरक्षारक्षकांनी केलेल्या नोंदीनुसार आणि कार्यालयीन अधीक्षकांनी दिलेल्या अहवालानुसार १७ आॅगस्ट रोजी सहायक आयुक्तांच्या बदल्या झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री ८.४६ वाजता मोरे पुन्हा दिवा प्रभाग समिती कार्यालयात आल्याची नोंद असल्याने संशयाची सुई त्यांच्याकडे वळली होती.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका