शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

ठामपा दोन तासांत खड्डा बुजवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 02:27 IST

रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी विविध तंत्रज्ञानांचा वापर केल्यानंतर आता ठाणे महापालिकेने खड्डा दाखवा, तो आम्ही दोन तासांत बुजवू, असा दावा केला आहे.

ठाणे : रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी विविध तंत्रज्ञानांचा वापर केल्यानंतर आता ठाणे महापालिकेने खड्डा दाखवा, तो आम्ही दोन तासांत बुजवू, असा दावा केला आहे. खड्डे बुजवण्याचा प्रतिसाद कालावधी कमी केला असून तत्काळ ते बुजवण्याची हमी दिली आहे. तसेच स्टारग्रेड अ‍ॅपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींचेसुद्धा तत्काळ निराकरण करण्याचा दावा केला आहे.महापालिका हद्दीत मागील काही दिवसांपासून रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. ते बुजवण्यासाठी विविध तंत्रज्ञानांचा वापर केला आहे. यातील काही तंत्रज्ञान यशस्वी झाले, तर काही अक्षरश: फेल गेले आहे. परंतु, पावसाने उसंत घेतल्यानंतर पालिकेने शहरात विशेष मोहीम हाती घेऊन आतापर्यंत ७५ टक्के खड्डे बुजवले आहे. तसेच उर्वरित खड्डे पाच ते सहा दिवसांत बुजवण्यात येतील, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.>आतापर्यंत या तंत्रज्ञानांचा केला वापरआतापर्यंत पालिकेने पुलांवरील खड्डे बुजवण्यासाठी अ‍ॅक्वा पॅच या तंज्ञत्रानाचा वापर केला असून त्यानुसार ८.१८ स्क्वेअर मीटरचे खड्डे त्यापासून बुजवले आहेत. यासाठी ६४ हजार ८०० रुपयांचा खर्च केला आहे. तर, इस्मॅक पीआर या पॉलिमर तंत्रज्ञानाचा वापरसुद्धा खड्डे बुजवण्यासाठी केला असून त्यानुसार १११.३६ स्क्वेअर मीटरचे खड्डे बुजवले आहेत. त्यावर एक लाख ६० हजार ८३८ रुपयांचा खर्च केला आहे. एमसिक्स्टी ग्रेडच्या तंत्रज्ञानात ३९०० स्क्वेअर मीटरचे खड्डे बुजवले असून त्यावर ४२ लाख ३८ हजार १३० रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तर, रेन पॉलिमर या तंत्रज्ञानात ९०९.९ स्क्वेअर मीटरचे खड्डे बुजवण्यात आले असून यासाठी १५ लाख ९३ हजारांचा खर्चकेला आहे.>स्टार ग्रेडवरील तक्रारी तत्काळ सोडवणारआता तत्काळ खड्डे बुजवण्यासाठीचा प्रतिसाद कालावधी कमी करण्यात आला असून खड्ड्यांची तक्रार करा, पुढील दोन तासांच्या आत ते बुजवले जातील, अशी हमी पालिकेने दिली आहे. तसेच स्टार ग्रेड अ‍ॅपवरसुद्धा त्याच्या तक्रारी आल्यास त्याचे निराकरण तत्काळ केले जाणार आहे. त्यातही यापूर्वी या अ‍ॅपवर नागरिकांना केवळ तक्रारीच करता येत होत्या. परंतु, आता केलेल्या तक्रारींवर काय कारवाई झाली, खड्डे बुजवले अथवा नाही, याची माहितीसुद्धा त्यांच्या मोबाइलवर दिली जाणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाPotholeखड्डे