शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ठामपाकडून हॉटेल्स, हुक्का पार्लर, पब यांना नोटीस बजावण्यास सुरवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 17:05 IST

कोठारी कंपाऊंडच्या मुद्यावरून महापालिकेवर आगपाखड झाल्यानंतर पुढील सात दिवसांची मुदत देत पालिकेने येथील हॉटेल्स, हुक्का पार्लर, पब यांना नोटीसा बजावण्यास सुरवात केली आहे.

ठाणे - कोठारी कंपाऊंडच्या मुद्यावरुन महापालिकेवर आगपाखड झाल्यानंतर पुढील सात दिवसांची मुदत देत पालिकेने येथील हॉटेल्स, हुक्का पार्लर, पब यांना नोटीसा बजावण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार आतार्पयत सुमारे 362 आस्थापनांना नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. त्यानंतर आता या नोटिशीनंतर पुढील आठवडय़ात कारवाईची दिशी ठरविली जाईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. 

     महापालिका हद्दीतील 500 चौरस फुट क्षेत्रफळापेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या जागेत सुरू असलेल्या बार, लाऊंज बार आणि हुक्का पार्लरवर कारवाई करताना त्यांना 7 दिवसांची नोटीस देण्याचा निर्णयही आयुक्तांनी घेतला आहे.  या आदेशान्वये त्यांनी ज्या आस्थापनांकडे अग्निशमन विभागाचा वैध दाखला नाही, ज्या आस्थांपनांकडे वैध दाखला आहे पण आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 मधील तरतुदीनुसार विहित नमुन्यातील फॉर्मं बी सादर केलेला नाही, ज्या आस्थापनांकडे अग्निशमन विभागाचा वैध दाखला आहे, आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 मधील तरतुदीनुसार विहित नमुन्यातील फॉर्मं बी ही सादर केलेला आहे. परंतू अग्निशमन विभागाच्या ना हरकत दाखल्यामध्ये नमुद केलेल्या अटी आणि शर्थीची पुर्तता करण्यात आलेली नाही,त्याचप्रमाणो आस्थापनाच्या ठिकाणी मंजुरीव्यतिरिक्त नियमबाह्य अंतर्गत व बाह्य बदल करून नियमांचे उल्लघंन करण्यात आलेले आहे अशा आस्थापनांवर कायद्यतील तरतुदींनुसार 7 दिवसांची नोटीस देवून कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.

    त्यानुसार कोठारी कंपाऊंडमधील अनाधिकृत गाळेधारकांबाबत महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमाचे कलम 260 व 267 अन्वये नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. आतार्पयत या भागातील सुमारे 362 आस्थापनांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता या आस्थापनांना आपल्या बाजू स्पष्ट करायच्या आहेत. परंतु पुढील आठडय़ापासून पालिका येथील आस्थापनांवर कारवाई करण्यास सुरवात करणार आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका