शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील ठकसेनाने मोदींच्या खात्यातून काढले १३.५५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 06:31 IST

खात्यातील १३ लाख ५५ हजार रुपये स्वत:च्या खात्यात वळते करणा-या एका ठकसेनाविरुद्ध कासारवडवली पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला.

ठाणे  - ठाण्यातील एका मोठ्या वाहन उद्योजकाच्या नावे बँकेला फोन करून उद्योजकाच्या खात्यातील १३ लाख ५५ हजार रुपये स्वत:च्या खात्यात वळते करणा-या एका ठकसेनाविरुद्ध कासारवडवली पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला.ठाण्यातील मोदी ह्युंदाईचे मालक गौतम मोदी यांचे घोडबंदर रोडवरील बेसीन कॅथलिक बँकेच्या वाघबीळ शाखेमध्ये खाते आहे. या बँक खात्याचे व्यवहार मोठे आणि नियमित असल्याने शाखा व्यवस्थापक जॉन मॅथ्यू लोपीस यांना हे खाते चांगलेच परिचित होते. आपल्या खात्यातील बहुतांश व्यवहार मोदी ई-मेलद्वारे करायचे. कुणाच्याही खात्यात पैसे वळते करायचे असतील अथवा अन्य कोणताही व्यवहार असल्यास मोदी त्यांच्या ई-मेलवरून बँकेला मेल पाठवायचे. त्यानंतर, बँकेकडून त्यांनी सूचना केल्याप्रमाणे व्यवहार पूर्ण केला जायचा. मोदी स्वत: जातीने बँकेत क्वचित यायचे. मंगळवारी शाखा व्यवस्थापक लोपीस यांच्या मोबाइल फोनवर आरोपीने कॉल केला. आपण गौतम मोदी बोलत असल्याचे सांगून आरोपीने दोन खात्यांमध्ये आठ लाख ५५ हजार रुपये आणि पाच लाख रुपये वळते करण्यास सांगितले.या व्यवहारासाठी थोड्याच वेळात त्याने मोदी यांच्या ज्या खात्यातून पैसे वळते करायचे, तो खाते क्रमांक आणि मोदी यांच्या धनादेशाचा क्रमांकही लोपीस यांच्या मोबाइल फोनवर पाठवला. त्यामुळे शाखा व्यवस्थापकाला अजिबात संशय आला नाही. त्यांनी आरोपीने दिलेल्या बँक खात्यांमध्ये १३ लाख ५५ हजार रुपये वळते केले.व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आपल्याशी संपर्क साधलेली व्यक्ती खुद्द मोदी नसल्याचे उघड झाले. लोपीस यांनी बुधवारी कासारवडवली पोलिसांकडे तक्रार दिली. अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या खात्यांमध्ये १३ लाख ५५ हजार रुपये वळते करण्यात आले.कार्यालयातील कर्मचाºयाचा सहभाग?हे खाते दिल्लीतील बँकेमधील असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस.पी. पवार यांनी दिली. मोदी यांचा खाते क्रमांक आणि धनादेशांचा तपशील आरोपीला कसा मिळाला, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मोदी यांच्या कार्यालयातील कर्मचारी यामध्ये सहभागी आहेत का, याचाही तपास केला जाईल, असे पवार यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार वाढल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणे