शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटाचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात; लवकरच ‘स्फोट’ होणार, प्रताप सरनाईकांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 07:17 IST

ठाण्यातील समतानगर परिसरातील घरांसंदर्भात सरनाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली.

ठाणे:  शिंदे गटाचे आठ ते दहा आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे विनायक राऊत यांनी केलेले वक्तव्य या केवळ वावड्या असून, ठाकरे गटाचेच काही आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून लवकरच स्फोट होईल, असा दावा शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी केला आहे. 

मंत्रिपदावरून दोन आमदारांमध्ये संघर्ष झाला असल्याच्या बातम्या टीआरपी वाढवण्यासाठी पेरल्या जात असून, सरकार चांगले काम करत असल्याने ते अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. भविष्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाण्यातील समतानगर परिसरातील घरांसंदर्भात सरनाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. त्यानंतर ते म्हणाले, अजित पवार यांच्या सरकारमधील प्रवेशानंतर शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असल्याची चर्चा आहे. मात्र, यामध्ये कोणत्याच प्रकारचे तथ्य नाही. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सर्व आमदारांनी मतदारसंघातील विकासकांमाच्या संदर्भात चर्चा केली.

शब्द पाळणारे नेते मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास सरनाईक यांना मंत्रिपद मिळेल, अशा चर्चा होत्या. मात्र, मला मंत्रिपद मिळणार हे कोणत्या ज्योतिषाने सांगितले, असा उलट प्रश्न सरनाईक यांनी प्रसार माध्यमांना केला. दुसरीकडे सत्तेत वाटेकरी वाढले असले, तरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेली अनेक वर्षे काम करत असून, हे दोन्ही नेते शब्द पाळणारे असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेpratap sarnaikप्रताप सरनाईकUddhav Thackerayउद्धव ठाकरे