शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

ठाण्यात हजारो विद्यार्थ्यांचे घुमले वंदे मातरमचे सूर, अडीच हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 16:56 IST

अडीच हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वंदे मातरमचे सूर निनादले. या विद्यार्थ्यांनी गुरूवारी ठाण्यात ‘सामहिक संपूर्ण वंदेमातरम’ गायन सादर केले.

ठळक मुद्देएकाच वेळी अडीच हजार विद्यार्थ्यांचे वंदेमातरमचे सूर घुमले ‘सामहिक संपूर्ण वंदेमातरम’ गायनाचा कार्यक्रम२१ शाळा व महाविद्यालयांचा समावेश

ठाणे: ठाण्यात एकाच दिवशी एकाच वेळी अडीच हजार विद्यार्थ्यांचे वंदेमातरमचे सूर घुमले. निमित्त होते ते भगिनी निवेदिता यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळाने आयोजित केलेल्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘सामहिक संपूर्ण वंदे मातरम’ गायनाच्या कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ठाणे शहरातील तब्बल अडीच हजार विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती.        गुरूवारी सकाळी मॉडेला कंपाऊंड, मुलुंड चेकनाक्याच्या जवळ, ठाणे येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला विश्व हिंदु परिषदेचे प्रांत मंत्री रामचंद्र रामुका, मुनी निलेशचंद्र महाराज, भगिनी निवेदिता मंडळाच्या रोहिणी बापट, सुनंदा अमरावतकर, माधव पुजारी, विक्रम भोईर, राजेंद्र पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन केल्यानंतर रोहीणी बापट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ‘संगठन गढे चलो, सुपंथपर बढे चलो’ या देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर जीवनव्रती कार्यकर्ती सुजाता दळवी यांनी ‘भगिनी निवेदिता’ या विषयावर तर अ. भा. विद्यार्थी परिषद, कोकणप्रांत मंत्री प्रमोद कराड यांनी ‘वंदे मातरम’ या विषयावर आपले विचार मांडले. कराड म्हणाले की, वंदे मातरमचा अर्थ समजून घेतला तर ‘वंदे मातरम म्हणा’ असे म्हणण्याची वेळ येणार नाही. त्यानंतर रामुका यांनी अध्यक्षीय भाषण केले. शेवटी अडीच हजार विद्यार्थ्यांनी आपल्या आवाजात ‘सामहिक संपूर्ण वंदेमातरम’ गायन सादर केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. अश्विनी बापट, प्रज्ञा पोळ यांनी सुत्रसंचालन तर आभार प्रदर्शन अमरावतकर यांनी केले. कार्यक्रमात सरस्वती सेकंडरी स्कूल, महाराष्ट्र विद्यालय, मो.ह. विद्यालय, ब्राह्ण विद्यालय, शिवसमर्थ विद्यालय, सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल, ज्ञानप्रसारणी विद्यालय, मनिषा विद्यालय, आर.जे. ठाकूर, श्रीराम विद्यालय, अनमोल, नानिक, पीपल्स एज्युकेशन, नाखवा, आनंद विश्वर गुरुकुल शाळा व महाविद्यालय, ज्ञानसाधना महाविद्यालय, जोशी बेडेकर महाविद्यालय अशा एकूण जवळपास २१ शाळा व महाविद्यालयांचा यात समावेश होता. महिनाभर आधीपासूनच विद्यार्थ्यांचा सराव त्यांच्या शाळांमध्येच सुरू होता. एका सूरात, एका तालात वंदे मातरम म्हणता यावे यासाठी प्रत्येक शाळांत सीडी आणि वंदे मातरम लिखीत पत्र तयार करुन मंडळाने दिले होते. सकाळी सात वाजल्यापासूनच या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रम आवडल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी आणि शिक्षकांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकSchoolशाळा