शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य ठाकरे यांच्या होळी मिलनाकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 06:22 IST

भाषा महत्त्वाची नाही, तर ‘दिल की बात’ येथे होते, म्हणून आलो आहे. माझ्यासाठी सर्व आपले आहेत, असे प्रतिपादन युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मीरा रोड येथे उत्तर भारतीयांच्या होळी मिलन समारोहात केले.

मीरा रोड - भाषा महत्त्वाची नाही, तर ‘दिल की बात’ येथे होते, म्हणून आलो आहे. माझ्यासाठी सर्व आपले आहेत, असे प्रतिपादन युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मीरा रोड येथे उत्तर भारतीयांच्या होळी मिलन समारोहात केले. होळी मिलनच्या माध्यमातून उत्तर भारतीयांशी राजकीय मनोमिलन करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला; परंतु बहुतांश खुर्च्या रिकाम्याच असल्याने उत्तर भारतीयांनी पाठ फिरवल्याचे दिसत होते.प्रताप फाउंडेशनच्या वतीने शिवार उद्यान येथे उत्तर भारतीयांचा होळी मिलन समारोह कार्यक्रम शिवसेना उपजिल्हाप्रमुख विक्रम प्रतापसिंह व युवासेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक यांनी आयोजित केला होता.होळी मिलनच्या माध्यमातून उत्तर भारतीयांशी मनोमिलन करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला; पण उत्तर भारतीयांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. व्यासपीठासमोर दोन भागांत मांडलेल्या खुर्च्यांपैकी एका भागातील सर्व खुर्च्या, तर दुसऱ्या भागातील बहुतांश खुर्च्या रिकाम्या असल्याने त्या काढून घेण्यात आल्या.महाराष्ट्रात माझ्यापेक्षा जास्त वर्षांपासून उत्तर भारतीय राहतात. माझ्यापेक्षा ते चांगली व स्पष्ट मराठी बोलतात. तुम्ही आमचे आणि आम्ही तुमचे आहोत, वेगळे नाहीत. चांगल्या, वाईट प्रसंगी आपण एकत्र येतो. आपण एकमेकांना आपले मानतो. भाषा महत्त्वाची नाही. दिल की बात येथे होते, म्हणून आलो, असे ठाकरे म्हणाले.आपल्या रक्ताचा, शरीराचा जो भगवा रंग आहे, तो उतरू देऊ नका. देशाचा पंतप्रधान काशीमधून येतो, म्हणून आम्ही त्यांच्याविरोधात नाही, तर सोबत उभे आहोत, असे ते म्हणाले. ठाकरेंसह सेनेचे उमेदवार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, आदी उपस्थित होते.‘सर्व आपलेच आहेत’ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात जय श्रीरामने केली. काही पत्रकारांनी विचारले, उत्तर भारतीयांच्या मंचावर तुम्ही काय बोलणार? कोणत्या भाषेत बोलणार? त्यावर, माझ्यासाठी सर्व हिंदुस्थानी आहेत व सर्व आपले आहेत, असे ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेMira Bhayanderमीरा-भाईंदर