शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटीकडून पत्रीपुलाची पुन्हा एकदा चाचणी करा; पालकमंत्र्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 01:04 IST

आवश्यक ती डागडुजी करून काही दिवसांनी पूल पाडण्यास हरकत नसेल, तर त्यादृष्टीने पावले उचलण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले

डोंबिवली : कल्याण येथील ब्रिटिशकालीन पत्रीपुलावरून हलकी वाहने जाऊ शकतात की नाही, यासंदर्भात तातडीने आयआयटीच्या अभियंत्यांशी चर्चा करून फिजिबिलिटी अहवाल पुन्हा एकदा घेण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी एमएसआरडीसीला दिले. आवश्यक ती डागडुजी करून काही दिवसांनी पूल पाडण्यास हरकत नसेल, तर त्यादृष्टीने पावले उचलण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासन हा पूल शुक्रवारी पाडणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झालेला असतानाच पूल पाडण्याचे काम शनिवारपासून सुरू होणार असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.गणेशोत्सवापूर्वी पत्रीपूल पाडल्यास त्यामुळे वाहतूककोंडीची गंभीर समस्या निर्माण होईल. दहीहंडीसह गणेशोत्सवावरही या पाडकामाचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून महापौर विनीता राणे, विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे, राजेश मोरे आदींनी पालकमंत्री एकनाथ शिंदेंची गुुरुवारी वेळ घेतली होती. त्यानुसार, मंत्रालयात दुपारी २ ते ४ या वेळेत त्यांची पालकमंत्र्यांसोबत या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली.मुंब्रा बायपाससाठी १० सप्टेंबरची डेडलाइन ठरवण्यात आली आहे. मुंब्रा बायपास सुरू झाल्यानंतर पत्रीपुलाचे काम तातडीने हाती घेण्यास हरकत नाही. तोपर्यंत पत्रीपुलाची तातडीची डागडुजी करून कल्याण-डोंबिवलीकरांची गैरसोय दूर करावी, असे आदेश एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार आयआयटीच्या तज्ज्ञांसमवेत तातडीने चर्चा केली जाईल, असे एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अभियंत्यांनी सांगितले. पालकमंत्र्यांंच्या मध्यस्थीमुळे या समस्येतून निश्चितच सुवर्णमध्य निघेल, काही ना काही तोडगा निघेल, असा विश्वास विश्वनाथ राणे यांनी व्यक्त केला.मध्य रेल्वे प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात या पुलासंदर्भात पत्र दिले होते. हा पूल हलक्या वाहनांसाठी निश्चितच चालेल. मात्र, अवजड वाहनांची वाहतूक बंद करा, असे या पत्रात म्हटले होते. असे असतानाही अंधेरी आणि लोअर परेल येथे घडलेल्या पादचारी, उड्डाणपुलांच्या काही दुर्घटनांची धास्ती घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे का, असा सवाल नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केला. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार पुलाची डागडुजी करावी. वाहतुकीसाठी पूल सुरू ठेवून वाहतूककोंडी सोडवावी, अशी मागणीही म्हात्रे यांनी यावेळी केली.शनिवारपासून पाडकामपालकमंत्र्यांनी पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक होऊ शकते की नाही, याबाबत आयआयटीकडून अहवाल मागविण्याचे आदेश दिले असले तरी, मध्य रेल्वेने मात्र पुलाचे पाडकाम शनिवारपासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

टॅग्स :kalyanकल्याण