शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात नेपाळी वॉचमन गँगची दहशत

By सदानंद नाईक | Updated: May 26, 2024 21:29 IST

कालीमाता मंदिरातील चोरी प्रकरणी, पोलीस पथके नेपाळी वॉचमनच्या मागावर

उल्हासनगर: कॅम्प नं-४ येथील प्रसिद्ध कालीमाता मंदिरातील दागिन्यांच्या चोरी प्रकरणी पोलीस पथक वॉचमन गॅंगच्या मागावर असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवल यांनी दिली. मुकुट फायनन्स, सोन्याचे दुकान आदी मुख्य चोरी प्रकरणात नेपाळी गँगचा सहभाग उघड झाला असून नेपाळी गँगने शहरात दहशद निर्माण केली.

 उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील ७० वर्ष जुन्या कालीमाता मंदिरात ४ दिवसांपूर्वी कामाला ठेवलेल्या वाचमनने एका साथीदाराच्या मदतीने मंदिरातील गर्भगृहातून देवीच्या दागिन्यांची चोरी केल्याचे उघड झाले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांचे पथके वॉचमनसह साथीदारांच्या मागावर असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवल यांनी दिली. चोरटे लवकरच पोलीस ताब्यात असतील असे संकेतही पोलिसांनी दिले. यापूर्वी भाटीया चौकातील गोदावरी इमारतीच्या एका उधोगपतीच्या घरी, मुकुट फायनन्स कार्यालयात, कॅम्प नं-१ येथील सोनार गल्लीतील एका सोनाराच्या दुकानात कोट्यावधीची चोरी नेपाळी वॉचमन गँगने केल्याचे उघड झाले. तर कॅम्प नं-४ येथील एका फायनन्स कंपनीच्या कार्यालयात रात्री लाईव्ह दरोडा करतांना पोलिसांनी दरोडेखोरांना शस्त्रासह अटक केली होती. त्यांच्याकडे गावठी कट्टा, तलवारी, चौपर, दोरी, गॅस कटर मशीन चोरट्याकडून जप्त केली होती. त्यावेळीही नेपाळी वॉचमन गॅंग असल्याचे उघड झाले होते. 

शहरातील फायनन्स कंपन्या, उधोगपतीची घरे, गृहनिर्माण सोसायटी, सोनाराचे दुकानदार आदी मध्ये नेपाळी वॉचमन गॅंगची दहशत निर्माण झाली आहे. अश्या सोसायट्या, सोनार दुकाने व इमारती आदी संस्था नेपाळी वॉचमन ठेवण्यास धजावत नसल्याचे उघड झाले. बहुतांश गृहनिर्माण सोसायटया, इमारती, फायनन्स कार्यालये आदीमध्ये वॉचमन म्हणून ठेवलेल्या नेपाळी वॉचमनचे कोणतेही ओळखपत्र, पुरावा सोसायटीकडे नसल्याचे उघड झाले. गेल्या काही वर्षांपूर्वी वॉचमनला कामावर ठेवण्यापूर्वी त्याचे ओळखपत्र सोसायटी, फायनन्स कार्यालय, इमारती आदींनी मागविले नाही. तसेच याबाबतची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक केली होती. मात्र कालांतराने यावर पडदा पडला असून नेपाळी वॉचमन गँगचे जबरी चोरी करण्याचे सत्र सुरूच असल्याची माहिती पोलिसांनी दिले

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगर