शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात शस्त्रधारी झुंडीची दहशत, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Updated: July 17, 2024 18:39 IST

झुंडीचा बंदोबस्त करा, नाहीतर नागरीक कायदा हातात घेतली... ठाकरेसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांचा पोलिसांना इशारा

उल्हासनगर : हातात घातक शस्त्र घेऊन तरुणांच्या झुंडी कोणासाठी परिसरातून फिरतात, त्यांचा वेळीच बंदोबस्त करा. नाहीतर नागरिक कायदा हातात घेतली. असा इशारा ठाकरेसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांनी विठ्ठलवाडी पोलिसांना देताच, पोलिसांनी १५ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करून काहीजणांना ताब्यात घेतले आहे.

 उल्हासनगर कॅम्प नं-४, संतोषनगर परिसरातून १५ ते २० जणांचे टोळके हातात घातक शस्त्र घेऊन रात्रीच्या वेळी धुमाकूळ घालते. अशी माहिती स्थानिक नागरिकांनी ठाकरेसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांना गेल्या आठवड्यात दिली. बोडारे यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, शस्त्रधारी झुंडीचा प्रकार उघड झाला. त्यांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाणे गाठून परिसरात झालेल्या प्रकारची माहिती दिली. तसेच परिसरातील याप्रकाराची माहिती पोलिसांना नाही का? यावर काय कारवाई केली? आदी प्रश्नांचा भडीमार त्यांनी पोलिसांना केला. तेंव्हा हा प्रकार पोलिसांना माहीत नसल्याचे उघड झाले. बोडारे यांनी दिलेल्या माहितीनुसार व तपासाअंती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी १५ पेक्षा जास्त जणांच्या झुंडीवर गुन्हा दाखल करून, काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पडवळ यांनी दिली आहे.

 शहरातील विविध चौक, जुन्या इमारती, रेल्वे स्टेशन परिसरात नशेखोर, गर्दुल्ले, भुरटे चोर रात्रीच्या वेळी धूमकुळ घालत असल्याचे चित्र आहे. असाच प्रकार संतोषनगर मध्ये गेल्या आठवड्यात घडला. बोडारे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे झुंडीवर गुन्हा दाखल झाला. शहरातील विविध भागात अश्या झुंडीची दहशत निर्माण झाली. यापूर्वी खेमानी परिसरात अश्या झुंडीने धुमाकूळ घातला होता. तर उल्हासनगर, विठ्ठलवाडी व शहाड रेल्वे स्टेशन परिसर, स्कायवॉक आदी ठिकाणी अश्या झुंडीची दहशत आहे.

 स्कायवॉकवर खून उल्हासनगरच्या स्कायवॉकवर एका तरुणाने दारू पिण्यासाठी पैशे दिले नसल्याच्या रागातून टोळक्याने त्याच्यावर शस्त्राने वार करून खून केला होता. तसेच एका वाहतूक पोलिसांवर जीवघेणा हल्ला झाला होता. हे कमी म्हणून की काय? रेल्वे स्टेशनच्या बंद निवासस्थानी एका तरुणीवर बलात्काराचा प्रकार उघड झाला होता. लूटमार, हाणामारी, फसवणूक आदी गुन्ह्याचीही नोंद आहे.

 रिक्षाची तोडफोड उल्हासनगर रेल्वे स्टेशन मध्ये अश्याच टोळक्याकडून रिक्षांची तोडफोड करण्याचे प्रकार यापूर्वी झाले. रात्रीचे १० नंतर स्कायवॉक व स्टेशन परिसरातून नागरिक जाण्यास धजावत नाही. अशी दहशत झुंडीची आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे