शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Ambernath: अंबरनाथमध्ये गुन्हेगारांची नंग्या तलवारी दाखवत माजवली दहशत, चार आरोपी अटकेत

By पंकज पाटील | Updated: October 19, 2023 17:40 IST

Ambernath News: अंबरनाथमध्ये चार गुंडांनी भररस्त्यात नांग्या तलवारी नाचवत धिंगाणा घालत दहशत निर्माण करण्याची घटना घडली आहे. अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बी केबिन रोड पर्यंत या गुन्हेगारांनी आपली दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

- पंकज पाटील अंबरनाथ  - अंबरनाथमध्ये चार गुंडांनी भररस्त्यात नांग्या तलवारी नाचवत धिंगाणा घालत दहशत निर्माण करण्याची घटना घडली आहे. अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बी केबिन रोड पर्यंत या गुन्हेगारांनी आपली दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. गुंडांचा हैदोस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे,तर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

अंबरनाथ पूर्व भागातील बी केबिन परिसरात किरकोळ वादातून एका चहाच्या टपरीवर मंगळवारच्या सुमारास काही गुंडांनी चहा कर्मचारीला बेदम मारहाण केल्याची घटना ताजी आता हातात नंग्या तलवारी नाचवत दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्न केला गेला आहे,गुंडांचा हैदोस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या आधारे या चारही आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.

हा सर्व प्रकार 10 ऑक्टोंबर रोजी रात्री घडला असून या घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर पोलिसांना जाग आली आहे. चार आरोपीमध्ये दोन अल्पवयीन आरोपी असल्याने अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची रवानगी बाळ सुधारगृहात करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे. दरम्यान गुन्हेगारांकडून भर रस्त्यात अशा प्रकारचे कृत्य केले जात असल्याने पोलिसांची दहशत काहीशी कमी झाली की काय अशी चर्चा रंगू लागली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीambernathअंबरनाथPoliceपोलिस