शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

मताधिक्यात विचारेंची मोदी -गांधींशी स्पर्धा, महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 01:01 IST

देशात सर्वाधिक मताधिक्य प्राप्त करणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा बहुमान विचारे यांनी प्राप्त केला आहे.

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपचे उमेदवार राजन विचारे यांनी तब्बल चार लाख १२ हजार १५१ एवढे विक्रमी मताधिक्य प्राप्त केल्याने देशात सर्वाधिक मताधिक्य प्राप्त करणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा बहुमान विचारे यांनी प्राप्त केला आहे. अर्थात गुजरात, हरियाणा तसेच राजस्थानच्या काही उमेदवारांनी सहा ते साडेसहा लाखांच्यापेक्षा जास्त मताधिक्य प्राप्त केले आहे.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गांधीनगर मतदारसंघातून पाच लाख ५७ हजार १४ एवढे मताधिक्य प्राप्त झाले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसीतून चार लाख ७९ हजार ५४५ एवढे मताधिक्य प्राप्त झाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना केरळमधील वायनाड मतदारसंघातून विजयी होताना चार लाख ३१ हजार ८७० असे मताधिक्य मिळाले.उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांना चार लाख ५७ हजार एवढे मताधिक्य प्राप्त झाले. त्यामुळे विचारे हे देशात मोठे मताधिक्य प्राप्त करणाºया उमेदवारांच्या यादीत गेल्याची चर्चा ठाण्यातील वेगवेगळ्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर सुरू झाली आहे. अर्थात, मोदींचे मताधिक्य विचारे यांच्यापेक्षा जास्त असतानाही त्या संदेशात त्यांना सहाव्या स्थानी दाखवले आहे. प्रत्यक्षात विचारे हे मोदींपेक्षा मताधिक्यात खाली आहेत.तसेच देशातील सर्वाधिक मताधिक्य मिळणाºया पाच खासदारांत भाजपच्याच उमेदवारांचा समावेश आहे. यात गुजरातच्या नवसारीचे खासदार सी.आर. पाटील यांना ६ लाख ७८ हजार ४४५ मताधिक्य मिळाले असून त्या खालोखाल हरियानाच्या कर्नालमधून संजय भाटिया यांना ६ लाख ५४ हजार२६९ तर राजस्थानच्या भिलवाडामधून सुभाषचंद्र बहोरिया यांनी ६ लाख ३७ हजार ९२० तर उत्तर प्रदेशातील फरिदाबादमधील कृष्ण पाल यांनी ६ लाख ३६ हजार ०३२ इतके प्रचंड मताधिक्य मिळविले आहे. म्हणजे विचारे यांचा नंबर देशात तुलनेनी खाली असला तरी महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य प्राप्त करणाऱ्यांमध्ये गोपाळ शेट्टी हे पहिल्या स्थानावर असतील, तर दुसºया स्थानावर राजन विचारे आहेत. तिसºया स्थानावर जळगावचे उन्मेष पाटील असून त्यांना चार लाख ११ हजार ६१७ एवढे मताधिक्य प्राप्त झाले आहे.

टॅग्स :thane-pcठाणेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019