शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाले हटवण्यासाठी विना निवीदा ठेका दिलेल्या ठेकेदाराचे काम अखेर थांबवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 20:24 IST

लाखो रुपये अदा केल्याची सखोल चौकशीची मागणी

मीरारोड - निवीदा न मागवताच दरमहा सुमारे २० लाख रुपयांचा ठेका मीरा भार्इंदर मधील प्रमुख १३ रस्त्यांवरील फेरीवाले हटवण्यासाठी दिल्याचे प्रकरण लोकमतने चव्हाट्यावर आणले असतानाच सत्ताधारी भाजपा व महापालिके विरोधात झालेल्या गंभीर तक्रारीं मुळे अखेर महापालिकेने ठेकेदाराची मुदतवाढ रद्द केली आहे. तर ठेकेदारास दिलेल्या लाखो रुपयांच्या देयकात घोटाळा असुन सखोल चौकशीची मागणी होत आहे.शहरातील फेरीवाल्यांना हटवण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची असुन त्यासाठी पथक असुनही सत्ताधारी भाजपा व प्रशासनाने मिळुन खाजगी ठेकेदार नेमला. भार्इंदर पुर्वेच्या रावल नगर, नर्मदादिप मधील फय्यज खान यांच्या एस.डी. सर्व्हिसेसने फेरीवाला हटवण्याचे काम मिळावे म्हणुन स्थायी समिती सभापतीं कडे अर्ज केला आणि केवळ अर्जाच्या आधारे आयुक्त बालाजी खतगावकरांनी देखील निवीदा न काढताच ठेका देऊन टाकला. मार्च ते मे २०१९ असे ३ महिन्यासाठी कंत्राट दिले गेले होते. त्यासाठी ५० कर्मचारी, स्कॉर्पियो, दुचाकी, टॅम्पो आदींच्या दरास मंजुरी दिली.ठेकेदाराने त्याला दिलेल्या १३ रस्त्यां वरील फेरीवाले पुर्णपणे हटवले नसतानाच पालिकेने मार्च व एप्रिलचे ३५ लाख त्याला दिले. तर मे व जुन चे तब्बल ५० लाख देण्याचे प्रयत्न होते. ठेक्याची मुदत ६ जुन रोजी संपलेली असताना त्याला कायम ठेवत तब्बल दिड महिन्यांनी म्हणजेच २३ जुलै रोजी पालिकेने ठेकेदारास आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देऊन टाकली. ती मुदत सुध्दा ६ आॅगस्ट रोजी संपलेली असताना नविन ठेकेदार नियुक्त करत नाही तो पर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने आॅगस्ट मध्ये दिला होता. पण लोकमत मधुन टिकेची झोड उठत असल्याने स्थायी समितीने अखेर प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळला. पण नंतर मात्र आयुक्त खतगावकरांनी २० सप्टेंबर रोजी पुन्हा मुदतवाढ दिली.फेरीवाले एकीकडे कायम असताना दुसरीकडे ठेकेदाराच्या कर्मचारी, वाहन, कारवाई आदी नोंदी केवळ हाताने नोंदवहित केल्या जात होत्या. या नोंदीत मोठा घोटाळा असल्याचे आरोप सुध्दा होऊ लागले. खासदार राजन विचारे व आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील विना निवीदा दिलेल्या ठेक्या प्रकरणी आयुक्तांसह प्रशासनाना जाहिरपणे फैलावर घेतले होते. आमदार गीता जैन, माजी नगरसेवक संजय पांगे आदिंनी या गैरप्रकाराच्या तक्रारी करुन कारवाईची मागणी केली.अखेर महापालिकेने ठेकेदाराला दिलेली मुदतवाढच रद्द करुन टाकली असुन त्याचे काम थांबवले आहे. परंतु वीना निवीदा दिलेले कंत्राट व लाखो रुपयांची देयके दिली गेली असल्याने यात नियमांचे उल्लंघन करुन पालिका निधीचा मोठा दुरुपयोग झाला आहे. फेरीवाल्यां वर कारवाई, मनुष्य व वाहनबळ आदींच्या नोंदी मध्ये सुध्दा घोटाळा असल्याने दिलेले लाखो रुपये परत वसुल करायासह अधिकारी, ठेकेदार आदींवर कारवाईची मागणी तक्रारदारांनी केली आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर