शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोपरीतील बँक आॅफ बडोदा मधून दहा हजारांची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 16:30 IST

ठाण्यातील कोपरी आनंद सिनेमागृहाच्या मागे असलेल्या बँक आॅफ बडोदा या बँकेचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न बुधवारी पहाटे चोरटयांनी केला. तो अयशस्वी ठरला. मात्र, बँकेत व्यवस्थापकांनी ठेवलेली त्यांची वैयक्तिक दहा हजारांची रोकड मात्र चोरटयांनी लंपास केली.

ठळक मुद्देतिजोरी फोडण्याचा प्रयत्न अयशस्वीबँकेचे लाखो रुपये वाचले

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील कोपरी आनंद सिनेमागृहाच्या मागे असलेल्या बँक आॅफ बडोदा या बँकेचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न बुधवारी पहाटे चोरटयांनी केला. तो अयशस्वी ठरला. मात्र, बँकेत व्यवस्थापकांनी ठेवलेली त्यांची वैयक्तिक दहा हजारांची रोकड मात्र चोरटयांनी लंपास केली. बँकेतील चोरीच्या या प्रयत्नामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी रात्री ८ वाजता बँक बंद केल्यानंतर १० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बँक उघडली. त्यावेळी चोरीचा हा प्रकार समोर आला. बँकेच्या पश्चिमेकडील भिंतीला असलेल्या काचेच्या खिडकीबाहेरील सुरक्षेसाठी लावलेली लोखंडी ग्रील बळाचा वापर करुन तोडण्यात आली. स्लायडींगची काच उघडून चोरटयांनी बँकेत प्रवेश केला. त्यानंतर बँकेच्या शाखा व्यवस्थापक अलका चाळके (५८, रा. कल्याण) यांच्या टेबलाच्या खणामध्ये वैयक्तिक वापरासाठी त्यांनी ठेवलेली दहा हजारांची रोकड लंपास करण्यात आली. मुख्य तिजोरीपर्यंत पोहचण्यापूर्वीच बँकेचा सुरक्षा सायरन वाजल्याने चोरटयांनी तिथून पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास पळ काढला. दरम्यान, याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात व्यवस्थापक चाळके यांनी चोरीची तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनिष पठाणे हे अधिक तपास करीत आहेत. बँक तसेच परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे यातील चोरटयांचा माग काढण्यात येत असल्याचे कोपरी पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेbankबँकtheftचोरी