शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खाडीपुलाचा प्रस्ताव मंजूर नसताना निविदांचा घाट; ४०० मीटर लांबीचा बांधणार पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 01:48 IST

ठामपा स्थायी समितीत प्रशासनाचे पितळ उघड

ठाणे : ठाणे शहरापासून जवळ असलेल्या खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी नागरे या महसुली गावांचा विकास नवीन ठाणे म्हणून केला जाणार आहे. भविष्यात या ठिकाणी बिझनेस हब आणि परवडणारी घरे अशा संकल्पनेतून नवीन ठाण्याचा विकास करण्याचा ठाणे महापालिका आणि एमएमआरडीए या दोनही प्राधिकरणांचा मानस आहे.

कासारवडवली ते खारबाव असा ४०० मीटर लांबीचा उड्डाणपूल खाडीवर उभारला जाणार आहे. त्या अनुषंगाने या कामासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी पटलावर आला होता. मात्र, महासभेत या ठरावाला अद्याप मंजुरीच मिळाली नसल्याची बाब स्थायी समिती सदस्य हणमंत जगदाळे यांनी उघड केली. सल्लागार नेमण्याचा ठरावच झाला नसतांना त्याची निविदाच कशी काढली असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

घोडबंदरपासून अवघ्या १७ किमी अंतरावर हे नवीन ठाणे विकसित होणार आहे. या भागात तब्बल ३ हजार हेक्टरवर नवीन ठाणे वसवले जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तब्बल ७५ हजार परवडणारी घरे निर्माण करण्याचा पालिकेचा मानस असणार आहे. या नव्या शहराची लोकसंख्या ही सुमारे चार लाखांच्या घरात जाणार आहे.

महापालिकेचा परवडवणारी घरे बांधणे हाच मानस राहणार आहे. तर एमएमआरडीएने या भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे निश्चित केले आहे. यानुसार १६ छोटी मोठी ग्रोथ सेंटर येथे निर्माण केले जाणार आहेत. येथे येणाऱ्या कामगारांच्या निवाºयाची जबाबदारी पालिका उचलणार आहे.

महासभेची मंजुरी अत्यावश्यक

या कामासाठी सल्लागार नेमण्याचे काम महापालिका करणार आहे. यासाठी ७२ लाख ६० हजारांचा खर्च अपेक्षित आहे. या सल्लागाराच्या माध्यमातून खाडीवर पूल बांधण्याच्या कामी सर्व्हेक्षण करणे, प्रस्ताव तयार करणे आणि पर्यावरण व इतर विभागाची आवश्यक ती परवानगी घेण्यासाठी या सल्लागाराची नेमणूक केली जाणार आहे.

परंतु, यापूर्वी महासभेत जो ठराव झाला होता. तो अद्यापही मंजूर नसल्याची गंभीर बाब यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी उघड केली. वास्तविक पाहता, महासभेत ठराव मंजूर झाल्यानंतर सल्लागार नेमणुकीचा किंवा निविदा काढणे योग्य ठरले असते.मात्र, तसे न करता ठराव मंजूर नसतांनाही सल्लागाराच्या निविदेचा प्रस्ताव आणलाच कसा गेला असा सवाल करूनत्यांनी हा प्रस्ताव तहकूब ठेवण्याची मागणी केली. स्थायी समितीची मिटिंग संपेपर्यंत ठराव न आल्याने अखेर हा सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र