शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात टेंडर घोटाळा, भाजपचा आरोप; महापालिका आयुक्तांना १५ दिवसाची मुदत

By सदानंद नाईक | Updated: January 20, 2024 20:24 IST

उल्हासनगरात एका माजी महापौरांचे नातेवाईक अरुण अशान यांनी राजकीय दबाव टाकून महापालिका प्रशासन व पी अँड झा कंपनीला हाताशी धरून मोठ्या कामाचे ठेके दिल्याचा आरोप भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी भाजप संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन केला.

उल्हासनगर : महापालिकेत संगनमत करून एकाच ठेकेदाराला कोट्यवधींचे ठेके देत असल्याने, मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. पत्रकार परिषदेला आमदार कुमार आयलानी, भाजप नेते नरेंद्र राजांनी, प्रकाश माखिजा आदीजन उपस्थित होते. तर निवेदनानुसार कामे दिली जात असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे. 

उल्हासनगरात एका माजी महापौरांचे नातेवाईक अरुण अशान यांनी राजकीय दबाव टाकून महापालिका प्रशासन व पी अँड झा कंपनीला हाताशी धरून मोठ्या कामाचे ठेके दिल्याचा आरोप भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी भाजप संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन केला. अटीशर्तीचे उल्लंघन व खोटे कागदपत्र जोडून त्या ठेकेदाराला कामे दिली जात आहे. महापालिकेकडून मिळालेले कामे तो ठेकेदार लहान ठेकेदाराद्वारे करून घेत असल्याचे रामचंदानी म्हणाले. यामुळे १०० कोटीचा घोटाळा झाला असून त्याबाबतची माहिती महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्यासह बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना दिल्याचे रामचंदानी म्हणाले. महापालिकेने १५ दिवसात कारवाई केली नाहीतर, भाजप आंदोलन करणार असल्याचा इशारा रामचंदानी यांनी दिली आहे. 

शहरात हजारो कोटींची विकास कामे सुरू असून त्यामध्ये ४२३ कोटींची भुयार गटार योजना, १२३ कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना, १५० कोटींची एमएमआरडीएचे रस्ते योजना, ४५ कोटीच्या निधीतून मूलभूत सुखसुविधेतील विविध कामे यांच्यासह अन्य विकास कामे सुरू आहे. याच कामाच्या टेंडरवरून ठेकेदारात, राजकीय नेते व महापालिका अधिकाऱ्याचा टेंडरवार सुरू असल्याचा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. भाजपच्या पत्रकार परिषदेला शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, आमदार कुमार आयलानी, नरेंद्र राजांनी, प्रकाश माखिजा, मीना आयलानी, अर्चना करणकाळे, राजेश वधारीया यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

प्रतिक्रिया १) अजीज शेख (महापालिका आयुक्त) महापालिका विकास कामासाठी निविदा प्रक्रिया राबवून निविदेत सहभागी होणाऱ्या कंपनीच्या कागदपत्रांची छाननी केली जाते. निविदेत कमी किंमतीच्या ठेकेदाराला काम दिली जातात. 

२) अरुण अशान (शिवसेना नेते) महापालिकेचे काम देतांना कोणताही राजकीय दबाव आणण्याचे कारण नाही. महापालिका निविदेतील अटी-शर्तीनुसार विकास कामे देते. रामचंदानी यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत.

 ३) प्रेम झा (पी अँड झा कंपनीचे प्रमुख) महापालिका निविदा प्रक्रियेत भाग घेऊन नियमानुसार कंपनीला काम मिळते. केलेले आरोप खोटे आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBJPभाजपा