शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

शहापूरच्या सापगावात २० दिवसांत १० जणांचा लेप्टो स्पायरोसिसने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 18:09 IST

ठाणे जिल्हा परिषदेला खडबडून जाग; कोरोना संकटात लेप्टोचा शिरकाव

ठाणे : सध्या कोरोनाच्या महासंकटाने हैराण असतानाच शहापूर तालुक्यातील सापगांव येथील दहा ग्रामस्थांचा वीस दिवसांत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विषयी ठाणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ. मनिष रेघे, यांना बोलते केले असता त्यांनी 'या ग्रामस्थांचा 'लेप्टो स्पायरोसीस' या आजाराने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.शहापूर या आदिवासी तालुक्यातील दुर्गम भागात सापगांव हे तीन हजार लोकवस्तीचे गांव आहे. अवघ्या २० दिवसांच्या कालावधीत दहा जणांचा मृत्यू झाल्याच्या या घटनेने ठाणे जिल्हा परिषद खडबडून जागी झाली आहे. शुक्रवारी आरोग्य समिती सभापती कुंदन पाटील व डॉ. रेघे यांनी या गावाला भेट देऊन येथील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी सुरु केली आहे. त्यात डेंग्यू च्या तुलनेत लेप्टो स्पायरोसीस या आजाराचे सिमटंन्स, लक्षणे आढळून आली आहे. तेथे त्वरीत आरोग्य कँम्प लाऊन ग्रामस्थांवर डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टो स्पायरोसिसचा उपचार सुरु केल्याचे डाँ. रेघे यांनी लोकमतला सांगितले.

वीस दिवसाच्या कालावधीत दगावलेल्यांमध्ये तरुणांसह, ४० ते ४५ वयाचे नागरिक आणि महिलांचा समावेश आहे. अवघ्या वीस दिवसात येथील पाच तरुणांसह पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. या ग्रामस्थांना विविध साथीच्या आजाराने ग्रासल्याचे निदर्शनास येताच जिल्हा परिषद सदस्या वंदना भांडे, यांनी तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क करून उपचार सुरु करण्याची मागणी लाऊन धरली. त्यास अनुसरुन आता या गावांत आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन युद्धपातळीवर उपचार सुरू केले आहे. या दरम्यान माजी आमदार पांडुरंगबरोरा, उपसभापती जगन पष्टे, गटविकास अधिकारी भवारी, शहापूर आरोग्य अधिकारी तरुलता धानके, जेष्ठ नेते किशनशेठ भांडे, काशिनाथ तिवरे, विलास गगे, निलेश भांडे, विनायक सापळे, मनोज धानके आदी या घटनेवर लक्ष ठेवून आहे.