शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता पथकाची धडक कारवाई; भिवंडीतून दहा लाख जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 09:15 IST

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू झाल्यानंतर भिवंडी शहरात  येणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

ठाणे - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू झाल्यानंतर भिवंडी शहरात  येणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. याकामी  137 भिवंडी पूर्व अंतर्गत शहरात  येणार्‍या सर्व वाहनांची तपासणी करण्याचे विशेष आदेश निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी संबंधितांना दिले आहेत. याकरता आचारसंहिता पथक, विशेष भरारी  पथक वाहन तपास पथक देखील स्थापन करण्यात आलेले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (26 सप्टेंबर) सकाळी साडेअकराच्या सुमारास या पथकामार्फत चावीन्द्रा तपासणी नाका येथे शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी करत असताना हुंडाई आय टेन वाहन क्रमांक MHO5. CV.7016   या वाहनांची तपासणी केली असता या वाहनांमध्ये अवैधरित्या रक्कम रुपये दहा लाख रुपये आढळून आले. याबाबत वाहन चालक यांचेकडे चौकशी केली असता वाहन चालक सुरेश धर्माणी यांनी कोणत्याही प्रकारे सदर रक्कमबाबत कागदपत्रे तपासणी पथकाकडे सादर केली नाहीत किंवा या रकमेबाबत कोणत्या प्रकारे खुलासा केला नसल्याने, 137 भिवंडी पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी सदरची रक्कम भिवंडी ट्रेझरी मध्ये जमा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सदरची रक्कम भिवंडी ट्रेझरी मध्ये जमा करण्यात आली आहे. याकामी आचार संहिता नोडल ऑफिसर प्रमुख पंढरीनाथ वेखंडे यांचे मार्गदर्शनाखाली, आचारसंहिता व्यस्थापन प्रमुख सुभाष झळके, एस.एस.टी पथक प्रमुख सहायक रवींद्र  शांताराम मदन आणि प्रकाश पाटील यांच्या आचारसंहिता पथक व विशेष तपास पथकाने पोलीस कर्मचारी यांनी सदरची कारवाई केलेली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीMONEYपैसा