शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नोकरी लावण्याचे अमिष: साडे नऊ लाखांची फसवणूक करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 23:02 IST

सरकारी नोकरी लावण्याचे अमिष दाखवत सुशिक्षित तरुणांना साडे नऊ लाखांचा गंडा घालणाºया निरज सोनवणे (२४, रा. औरंगाबाद) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक ने नुकतीच अटक केली आहे. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाई खासगी गाडीवार राजमुद्रेचे चिन्हअनेक सुशिक्षितांना घातला गंडा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राजमुद्रा आणि भारत सरकारच्या नावाचा बेकायदेशीरपणे वापर करुन सरकारी नोकरी लावण्याचे अमिष दाखवत सुशिक्षित तरुणांना साडे नऊ लाखांचा गंडा घालणा-या निरज सोनवणे (२४, रा. औरंगाबाद) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक ने नुकतीच अटक केली आहे. त्याला १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.ठाण्याच्या हॉटेल स्क्वेअर जवळील भाजी मार्केट येथे एका वाहनावर गव्हरमेंट आॅफ इंडिया, कौसिल आॅफ आर्किटेक्चर, मिनिस्टरी आॅफ लेबर अ‍ॅन्ड एप्लॉयमेंट, नवी दिल्ली या नावाने शासनाची राजमुद्रा आणि भारत सरकार असा बोर्ड लावलेला आढळला. या गाडीतील व्यक्ती अशा कोणत्याही कमिटीचा सदस्य नसतांना तो ते वापरत असल्याची टीप १३ नोव्हेंबर रोजी सहायक पोलीस निरीक्षक अविराज कु-हाडे यांना मिळाली. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरज सोनवणे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. तेंव्हा त्याने कमिटीचा सदस्य असल्याचे स्वत:चे नावाचा उल्लेखासह राजमुद्रा असलेले बनावट लेटर पॅड , ओळखपत्र, नावाची पाटी असे तयार करुन तो लोकसेवक नसतांनाही त्याने लोकसेवकाची बतावणी करुन तोतयागिरी केली. तसेच त्याने जानेवारी २०१७ ते आॅगस्ट २०१८ या कालावधीत अनेक युवकांना अशाच प्रकारे तयार केलेल्या बनावट राजमुद्रा, बनावट ओळखपत्र आणि लेटरपॅड दाखवून शासकीय सेवेत नोकरी लावण्याचे अमिष दाखविले. याच प्रभावातून त्यांच्याकडून रोखीने आणि बँक खात्यामार्फत साडे नऊ लाखांची रक्कम घेतली. मात्र कोणालाही नोकरीला न लावता त्यांची आर्थिक फसवणूक केली. तसेच एका साक्षीदाराचे तलाठी पदासाठी ठाण्याच्या तहसिलदार यांची खोटी स्वाक्षरी करुन बनावट ओळखपत्र तयार केल्याचेही चौकशीत उघड झाले. याप्रकरणी निरज विरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी