शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

नोकरीच्या प्रलोभनाने लाखोंचा गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 02:58 IST

केडीएमसी किंवा वाहतूक शाखेत कायमस्वरूपी नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवत लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका महिलेविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात नलिनी उघडे (५८, रा. मिलिंदनगर) यांनी गुरुवारी तक्रार दाखल केली.

कल्याण : केडीएमसी किंवा वाहतूक शाखेत कायमस्वरूपी नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवत लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका महिलेविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात नलिनी उघडे (५८, रा. मिलिंदनगर) यांनी गुरुवारी तक्रार दाखल केली. पोलिसांनी किरण दिलीप फुंदे हिच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.नलिनी यांच्या मुलाला केडीएमसी किंवा वाहतूक शाखेत कायमस्वरूपी नोकरी देण्याचे प्रलोभन त्यांच्या ओळखीतील फुंदे हिने २०१२ मध्ये त्यांना दाखवले होते. नलिनी यांनी टप्प्याटप्प्याने फुंदे हिला एक लाख १० हजार रुपये रोखीने दिले होते. तसेच, नलिनी यांच्या भावानेही एक लाख ३० हजार रुपये दिले होते. त्यानंतर, वेळोवेळी फुंदे हिच्याकडे मुलाच्या नोकरीबाबत नलिनी चौकशी करत होत्या. परंतु, ती त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत होता. नलिनी यांचा तगादा पाहून तिने केडीएमसीमध्ये जागा नसून वाहतूक शाखेत नोकरी लावण्याची बतावणी करत त्यांच्याकडून वेळ वाढवून मागत होती. मात्र, त्यानंतरही काम होत नसल्याने नलिनी यांनी फुंदे हिच्याकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. तेव्हा फुंदे हिने दमदाटी करत माझा मेहुणा पोलीस खात्यात असल्याचे सांगत जर पैसे मागितले तर, मी स्वत:ला जाळून घेऊन त्यात अडकवण्याची तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याचे नलिनी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी