शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

आॅस्ट्रेलियात ठाण्यातील तेजस देशमुख ‘इंटरनॅशनल स्टूडंट आॅफ द ईयर - रीजनल’ पुरस्काराने सन्मानीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 15:20 IST

या सन्मानाविषयी वडील म्हणून विकास देशमुख यांचे मत जाणून घेतले असता ते म्हणाले की ‘ खास करून तेजसचे बालपण तसेच शिक्षण ठाण्यातच झाल्यामुळे तो पूर्णपणे ठाणेकर आहे. त्याच्या या यशामुळे सर्व कुटुंबीय आनंदात असून भारावून गेलो आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. आॅस्ट्रेलियातील त्याचे उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने भारतात येऊन त्याच्या आंतरराष्ट्रीय अनुभवाचा फायदा आपल्या देशाच्या विकाससाठी करावा’ अशी इच्छा देशमुख यांनी वडील या नात्याने लोकमतकडे व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देआॅस्ट्रेलियातील बेंडीगो या शहरात ठाणे येथील लुईसवाडीचा मुळचा रहिवाशी तेजस देशमुख उच्च शिक्षण घेत आहे‘ला ट्रोब विद्यापीठा’ने ‘इंटरनॅशनल स्टूडंट आॅफ द ईयर - रीजनल’ हा पुरस्कार देऊन सन्मानीतव्यापार आणि गुंतवणूक मंत्री फिलिप दलिदाकीस यांच्या शुभहस्ते तेजसला हा शिक्षण पुरस्कार देऊन सन्मानित

ठाणे : नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील कॉलेजमधून आर्किटेक्चर (वास्तुविशारद) ची पदवी घेऊन आॅस्ट्रेलियातील बेंडीगो या शहरात ठाणे येथील लुईसवाडीचा मुळचा रहिवाशी तेजस देशमुख उच्च शिक्षण घेत आहे. त्याला ‘ला ट्रोब विद्यापीठा’ने ‘इंटरनॅशनल स्टूडंट आॅफ द ईयर - रीजनल’ हा पुरस्कार देऊन सन्मानीत केले. त्यांच्या या यशाबद्द त्यांचे वडील विकास देशमुख यांचे ठाणे शहरातील नागरिकांसह नातेवाईकांकडून रोजदार अभिनंदन होत आहे.      आॅस्ट्रेलियाच्या बेंडिगो शहरातील ‘ला ट्रोब विद्यापीठ’मध्ये तेजसला हा ‘इंटरनॅशनल स्टूडंट आॅफ द ईयर - रीजनल २०१८’ चा शिक्षण पुरस्कार २५ सप्टेंबर रोजी प्राप्त झाला. आॅस्ट्रेलियातील डेकिन एज, फेडरेशन स्क्वेअर, मेलबर्न येथे हा पुरस्कार वितरणसमारंभात पार पडला. यावेळी व्यापार आणि गुंतवणूक मंत्री फिलिप दलिदाकीस यांच्या शुभहस्ते तेजसला हा शिक्षण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या विद्यापीठात तेजस ‘समाज नियोजन आणि विकास’ या विषयावर मास्टर्सची पद्वीप्राप्त करीत असल्याचे तेजसचे वडील विकास देशमुख यांनी लोकमतला सांगितले.आॅस्ट्रेलियाच्या या विद्यापीठात प्रत्येक वर्षी सुमारे १७० देशांतील दोन लाख आंतरराष्ट्रीय विद्यार्थी व्हिक्टोरिया शिक्षणासाठी येतात. या व्हिक्टोरियन शिक्षणात भारत दुसऱ्या क्र मांकावर आहे. व्हिक्टोरियन इंटरनॅशनल एज्युकेशन अवॉर्ड २०१८ प्राप्त करणारा ठाणे शहरातील तेजस हा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये एकमेव भारतीय विद्यार्थी ठरला असल्याचे देशमुख यांनी सांगितले. त्याच्या प्रचंड प्रयत्नांमुळे आणि उत्साहानंतर तेजसला सुमारे ४०० प्रतिनिधींच्या उपस्थितीत शैक्षणिक क्षेत्रातील या मानाच्या पुरस्काराचा विजेते घोषित केला. याशिवाय त्याला आॅस्ट्रेलिया सरकारच्या शिक्षण विभागाकडून दहा हजार डॉलरचे बक्षीस देखील देऊन सन्मानीत केल्याचे सुतोवाच देशमुख यांनी केले.या सन्मानाविषयी वडील म्हणून विकास देशमुख यांचे मत जाणून घेतले असता ते म्हणाले की ‘ खास करून तेजसचे बालपण तसेच शिक्षण ठाण्यातच झाल्यामुळे तो पूर्णपणे ठाणेकर आहे. त्याच्या या यशामुळे सर्व कुटुंबीय आनंदात असून भारावून गेलो आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. आॅस्ट्रेलियातील त्याचे उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने भारतात येऊन त्याच्या आंतरराष्ट्रीय अनुभवाचा फायदा आपल्या देशाच्या विकाससाठी करावा’ अशी इच्छा देशमुख यांनी वडील या नात्याने लोकमतकडे व्यक्त केली आहे. 

 

टॅग्स :thaneठाणेcity chowkसिटी चौक