सणासुदीच्या दिवसांत पाणीकपात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 05:41 AM2018-10-06T05:41:49+5:302018-10-06T05:42:24+5:30

धरणांतील पाणीसाठा घटला : प्रशासनाच्या हालचाली सुरू; १४ ते १५ टक्के कपातीची शक्यता

Water fall in festive days! | सणासुदीच्या दिवसांत पाणीकपात!

सणासुदीच्या दिवसांत पाणीकपात!

Next

सुरेश लोखंडे

ठाणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पडलेला कमी पाऊस आणि धरणात कमी झालेला साठा, यामुळे ऐन नवरात्री आणि दिवाळीच्या दिवसांत जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिकांना पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे. यासाठी प्रशासनाच्या जोरदार हालचाली सुरू असून पुढील आठवड्यात पाणीकपातीवर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत आहेत.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुमारे १४ टक्के पाणीकपात लागू केली होती. फेब्रुवारीत ती कमी करून सात टक्के केली. त्यानंतर, एप्रिल-मेपासून कपात रद्द केली; पण उल्हासनगर महापालिकेने आताचा पावसाळा संपला, तरी एक दिवसाची पाणीकपात कायम ठेवून वेठीस धरले. उल्हासनगरच्या बहुतांश भागात शुक्रवारी दिवसभर पाणी सोडले जात नाही. महापालिकेच्या या मनमानीची झळ वर्षभरापासून नागरिकांना सोसावी लागत आहे. यावेळीही सक्तीच्या पाणीकपातीला त्यांना तोंड द्यावे लागणार आहे. जिल्हाभरात सुमारे १४ ते १५ टक्के सक्तीच्या पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे.
यंदा सरासरी दोन हजार ५१७.९१ मिमी पाऊस पडला. मागील वर्षी तो सरासरी तीन हजार ३४३.३४ मिमी पडला होता. मागील वर्षी परतीचा पाऊस जोरदार होता. ओखी चक्रीवादळाच्या कालावधीत जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडला होता. यंदा मात्र परतीच्या पावसाकडूनही उपेक्षाच होत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आगामी तीन दिवसांत परतीचा पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, त्यामुळे धरण भरण्याची शक्यता नसल्यामुळे पुढील आठवड्यापासून १४ ते १५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाणीकपात लागू करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे.

धरणातील पाणीसाठा

शंभर टक्के भरलेल्या बारवी धरणात आता २२६.७३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. या धरणात मागील वर्षी १०० टक्के म्हणजे २३३.०७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. तरीदेखील १४ टक्के पाणीकपात लागू केली होती.

त्यावेळी धरणाखालील पाणी उचलण्यात येत होते. आता मागील १५ दिवसांपासून धरणातील पाणीपुरवठा शहरांना करावा लागत आहे. यामुळेही साठा झपाट्याने कमी झाला आहे.

उल्हास नदीच्या आंध्रा धरणातही ३२४.२२ दशलक्ष घनमीटर (९५.६० टक्के) साठा आहे. या तुलनेत मागील वर्षी तो ३३७.३८ दशलक्ष घनमीटर म्हणजे ९९.४८ टक्के पाणीसाठा असतानाही पाणीकपात लागू केली होती.

आता सर्वच धरणांतील पाणीसाठा कमी झाला आहे. यामुळे यंदा लवकर कपात लागू करून १५ जुलैपर्यंत पाणीसाठा पुरवण्याची तजवीज जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे.

च्मुंबईसह ठाणे महापालिकेला
पाणीपुरवठाकरणाऱ्या भातसा
धरणात
म्हणजे
८८५.८६
दशलक्ष घनमीटर
पाणीसाठा आहे. या
धरणात मागील वर्षी ९३७.४० दशलक्ष घनमीटर (९९.५० टक्के) पाणीसाठा होता.

च्यंदा या धरणात केवळ सरासरी २०६४ मिमी पाऊस पडला. मागील वर्षी तो सरासरी ३२०३ मिमी म्हणजे यंदाच्या तुलनेत सरासरी एक हजार १३९ मिमी जादा पाऊस पडला होता.
च्याप्रमाणेच ठाणे शहराच्या काही भागांसह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिका आणि अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर या नगरपालिकांना पाणीपुरवठा करणाºया बारवी धरण व उल्हास नदीला पाणीपुरवठा करणाºया आंध्रा धरणातही मागील वर्षाच्या तुलनेत कमी साठा आहे.
 

Web Title: Water fall in festive days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.