ठाण्यातील जलवाहतुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे परीक्षण, महानगरे खाडीमार्गे जोडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 05:43 AM2019-08-13T05:43:08+5:302019-08-13T05:45:50+5:30

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जलवाहतुकीला चालना दिली जात असून पहिल्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर आता...

teasting The second phase of water transport | ठाण्यातील जलवाहतुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे परीक्षण, महानगरे खाडीमार्गे जोडणार

ठाण्यातील जलवाहतुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे परीक्षण, महानगरे खाडीमार्गे जोडणार

Next

ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जलवाहतुकीला चालना दिली जात असून पहिल्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर आता दुस-या टप्प्यात ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई या शहरांना जोडण्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. तसेच या खाडीलगतच्या अभयारण्यातील वन्यजीवांवर जलवाहतूक प्रकल्पामुळे काही परिणाम होऊ शकतो का, याचा अभ्यास लवकरच सुरू करण्यात येणार असून त्याचबरोबर वसई ते
मीरा-भार्इंदर आणि कल्याण-डोंबिवली भागातील खाडीतून दगड आणि गाळ काढल्यानंतर त्याचा पर्यावरणावर काही परिणाम होऊ शकतो का, याचाही सविस्तर अभ्यास केंद्र शासनाच्या संस्थेमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.
ठाणे शहरासाठी जलवाहतूक प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार असल्याने ठाणे महापालिकेच्या माध्यमातून त्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यानुसार ठाणे, मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार, मीरा-भार्इंदर आणि कल्याण-डोंबिवली शहरांवरील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर गेल्या काही वर्षांत भार वाढला असून तो कमी करण्यासाठी या शहरांना जोडणाºया खाडीमध्ये अंतर्गत जलवाहतूक प्रकल्प राबविण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला होता. पहिल्या टप्प्यात ठाणे, वसई-विरार, मीरा-भार्इंदर आणि कल्याण-डोंबिवली या शहरांमध्ये अंतर्गत जलवाहतूक प्रकल्प राबवण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेने या प्रकल्पासाठी तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालास केंद्र शासनाने मंजुरी दिली असून या प्रकल्पाच्या उभारणीसाठी प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
अहवालास डिसेंबर महिना उजाडणार
या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय जलवाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी नवी दिल्लीमध्ये नुकतीच एक बैठक घेतली होती. त्यामध्ये या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी येत्या आॅक्टोबर महिन्यापर्यंत करण्याचे आदेश त्यांनी बैठकीत दिले होते. या जलमार्गासाठी एकूण ६४५ कोटीचा खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात मीरा-भार्इंदर, कोलशेत, काल्हेर आणि डोंबिवली या चार ठिकाणी जेटी बांधणे, रिव्हर इन्फॉर्मेशन सिस्टीम विकसित करणे, तीन वर्षे बोटींची दुरुस्ती, निगा व देखभाल अशी कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी आवश्यक असलेल्या ८६ कोटी रु पयांचा निधी त्वरित उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी दिले होते. याच बैठकीमध्ये ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई या शहरांना जोडण्यासाठी खाडीमध्ये जलवाहतूक प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याकरिता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश त्यांनी ठाणे महापालिकेला दिले होते. त्यानुसार, ठाणे महापालिका प्रशासनाने तो तयार करण्याचे काम सुरू केले आहे. येत्या आॅक्टोबर महिन्यापर्यंत हा अहवाल तयार करण्याचा प्रशासनाचा मानस
असला, तरी हे काम पूर्ण
होण्यासाठी डिसेंबरपर्यंतचा अवधी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

खाडीत याची केली तपासणी

खाडीमार्गात खडक आहे का, याचीही पाहणी करण्यात आली. कोणत्या भागात दगड आणि मातीचा गाळ काढावा लागेल, याचाही अभ्यास करण्यात आला होता. तसेच खाडीच्या तळाशी असलेले खडक, माती आणि गाळ याचेही परीक्षण करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आता ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई या मार्गाची तपासणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दुसरा टप्पा ९० किमीचा : ठाणे, वसई-विरार, मीरा-भार्इंदर आणि कल्याण-डोंबिवली या पहिल्या टप्प्यात ५० किमी लांबीचा अंतर्गत जलवाहतूक प्रकल्प राबविला जाणार आहे. तर ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई या दुसºया टप्प्यात ९० किमी लांबीचा अंतर्गत जलवाहतूक प्रकल्प राबविला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील जलमार्गाची आठ महिन्यांपूर्वी चाचपणी करण्यात आली होती.

Web Title: teasting The second phase of water transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे