शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये तीन अल्पवयीन मुलांवर शिक्षकाचा अत्याचार; पोलिसांनी शिक्षकाला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 05:51 IST

अत्याचाराचा व्हिडीओ काढून केली दमदाटी. अंबरनाथ पश्चिमेच्या वांद्रापाडा परिसरात एका सेवाभावी संस्थेची शाळा आहे. या शाळेत परिसरातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतात.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : अंबरनाथमध्ये एका सेवाभावी संस्थेच्या शाळेत शिक्षकाने तीन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक घटना उघड झाली. अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. शेजारील बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील शिपायाने काही महिन्यांपूर्वी अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघड होऊन प्रचंड आक्रोश निर्माण झाला होता. ही घटना अद्याप ताजी असताना अंबरनाथमध्ये तीन मुले शिक्षकाकडूनच लैंगिक अत्याचाराची शिकार झाली.

अंबरनाथ पश्चिमेच्या वांद्रापाडा परिसरात एका सेवाभावी संस्थेची शाळा आहे. या शाळेत परिसरातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील काही अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत इथला शिक्षक लैंगिक चाळे करत होता. या प्रकरणाचा व्हिडिओ तयार करून तो या मुलांना ब्लॅकमेल करत होता. त्यामुळे घाबरलेल्या काही मुलांनी शाळेत जायला नकार दिल्यानंतर त्यांच्या पालकांनी चौकशी केली असता हा सगळा प्रकार उघड झाला. पालकांच्या तक्रारीवरून अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी या नराधम शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली. ज्या परिसरात ही शाळा आहे त्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

‘त्यांना’ जामीन मंजूरबदलापूरमधील शाळेतील शिपाई अक्षय शिंदे याने काही महिन्यांपूर्वी दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले होते. त्यानंतर संतप्त नागरिकांनी शाळेत घुसून तोडफोड केली. त्यानंतर हजारोंचा जमाव बदलापूर रेल्वे स्थानकात घुसून रेल्वेमार्गात बसला. तब्बल अकरा तास रेल्वे वाहतूक ठप्प होती. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली. अक्षय शिंदे हा पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचा मुंब्रा येथे एन्काउंटर झाला. दीर्घकाळ फरार असलेले शाळेचे विश्वस्त व मुख्याध्यापिका हे त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात आले व त्यांना तातडीने जामीन प्राप्त झाला.

टॅग्स :Molestationविनयभंग