शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

३७ हजार ९३० कोटींचा कर बुडीत?, बनावट सही-शिक्के वापरून अनधिकृत बांधकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 02:08 IST

२७ गावातील ग्रामपंचायतीचे बनावट सही-शिक्के वापरून अनधिकृत बांधकामे उभारली जात असल्याने दोन वर्षात सरकारचा ३७ हजार ९३० कोटींचा कर बुडाल्याचा खळबळजनक आरोप या गावांतील बांधकाम व्यावसायिक संतोष डावखर यांनी केला आहे.

मुरलीधर भवार कल्याण : २७ गावातील ग्रामपंचायतीचे बनावट सही-शिक्के वापरून अनधिकृत बांधकामे उभारली जात असल्याने दोन वर्षात सरकारचा ३७ हजार ९३० कोटींचा कर बुडाल्याचा खळबळजनक आरोप या गावांतील बांधकाम व्यावसायिक संतोष डावखर यांनी केला आहे.गावातील अनधिकृत बांधकामांचे रजिस्ट्रेशन बंद झाल्याने अशी बांधकामे करणाºयांच्या पोटात गोळा आला आहे. हीच मंडळी सरकारचा कर बडवून कोट्यवधी रुपयांना चुना लावत होती आणि घर खरेदी करणाºया सामान्यांची फसवणूक करत होती, असा दावा त्यांनी केला.कल्याण-डोंबिवली पालिकेतून २७ गावे २००२ साली वगळण्यात आल्यानंतर ती एमएमआरडीएच्या अंतर्गत होती. त्यांनी त्या काळात एकाही बांधकामाची परवानगी दिली नव्हती. जिल्हाधिकाºयांमार्फतच तो प्लॉट एनए होत असे. अशी प्रकरणे हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकामे उभी राहिल्याने ती बेकायदा असल्यावर शिक्कामोर्तब होत असल्याचा त्यांचा दावा आहे. ज्यांनी बांधकामे केली. त्यांनी ग्रामपंचायतींच्या सही- शिक्याचा वापर करुन परवानगी मिळाल्याचा दावा केला असला तरी परवानगी देण्याचा अधिकार ग्रामपंचायतींना नव्हता. तसेच बांधकाम मंजुरीच्या अर्जाचा तांत्रिक तपासणी करणारा कर्मचारी वर्ग व खातेही ग्रामपंचायतींकडे नव्हते. २००७ ते २०१७ या कालावधीत अशाप्रकारे मंजुरी मिळवून इमारती उभ्या राहिल्या. त्यात चार ते सात मजली इमारतींचा अधिक समावेश आहे. सरकारी व गुरचरण जमिनीवरही बांधकाम परवानगी दिली गेली आहे. अनेक बेकायदा इमारती तर तीन ते चार महिन्यात उभ्या राहिल्या असल्याने त्यांच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह आहे. त्या कोसळून जीवितहानी झाल्यास खोट्या- सही शिक्क्यांचा वापर करणारे शेतकरी आणि ग्रामपंचायतीचे सदस्य-कर्मचारी तुरुंगात जातील, याकडे त्यांनी लक्ष वेधले. २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिकेची मागणी २००२ साली गावे वेगळी झाली तेव्हाच का केली गेली नाही? ही मागणी आत्ताच करण्याचा काय उद्देश आहे, असे सांगत या मागणीमागचे अर्थशास्त्र डावखर यांनी उलगडले. रजिस्ट्रेशन थांबल्याने हप्ते घेणारे व देणाºयांचे नुकसान झाल्याचा दावाही त्यांनी केला.अशी होतेय फसवणूकइमारती बांधण्याचा प्रकार कसा होतो, तेही त्यांनी उलगडले. आठ गुंठे जागेचा सातबारा असेल, तर त्यापैकी तीन गुंठे जमीन मालकाकडून लिहून घ्यायचे. रजिस्ट्रेशन करताना दोन ते तीन लाख फुटांचे करायचे. एका इमारत उभारण्यापुरती बांधकाम कंपनी स्थापन करायची. इमारत बांधून पूर्ण झाल्यावर कंपनीचा कारभार गुंडाळून दुसरी कंपनी स्थापन करुन दुसरे काम सुरु करायचे. त्यामुळे सगळे टॅक्स भरण्याचा प्रश्नच निकाली काढायचा, असा व्यवहार सुरू असल्याचे ते म्हणाले. यातून सर्व्हिस टॅक्स, विकास कर, टीडीआर व प्रिमीयम चार्जेस, ओपन लॅण्ड टॅक्स, उत्खननाची रॉयल्टी, कामगार उपकर, इन्कम टॅक्स असे सगळे धरुन ११ लाख ६१ हजार रुपयांचे कर एका फ्लॅटच्या रजिस्टेशनपोटी बुडतात. दिवसाला किमान ६३ फ्लॅटचे रजिस्ट्रेशन होते. २४ दिवसात १,५१२ फ्लॅट रजिस्टर होतात. वर्षाला हाच आकडा १८ हजार १४४ फ्लॅटच्या घरात जातो. कल्याण व अंबरनाथ तालुक्यात दुय्यम निबंधकांची फ्लॅट रजिस्ट्रेशनची नऊ कार्यालये आहेत. दोन वर्षे सर्व प्रकाराचा कर धरुन ३७ हजार ९३० कोटींचा कर बुडाला आहे. हा कर सरकारी तिजोरीत जमा झाला असता, तर शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी उपयुक्त ठरला असता. आता लागू झालेला १२ जीएसटी पाहता आगामी काळात या बुडीत करात वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज डावखर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार