शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांत करवसुली 100 कोटींच्या पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 01:39 IST

मीरा-भाईंदर महापालिका : २०० कोटींचे उद्दिष्ट

मीरा राेड : मीरा भाईंदर महापालिकेने गेल्या पाच महिन्यांत मालमत्ता व अन्य करांची १०० कोटी ९३ लाखांपर्यंत वसुली केली आहे. शनिवार व रविवारी सुटीच्या दिवशीही करभरणा केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत. चालू आर्थिक वर्षात कर वसुलीचे २०० कोटींचे उद्दिष्ट असून मार्च अखेरपर्यंत उर्वरित कर वसुलीचे आव्हान पालिकेला पेलायचे आहे.

महापालिकेच्या कर विभागाच्या नोंदीनुसार शहरात तीन लाख ५७ हजार मालमत्ता खातेदार आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात कराची मागणी २७१ कोटी रुपये इतकी आहे. परंतु त्यात मोबाइल टॉवरचे कर, दुबार आकारणी व निर्लेखित कर असल्याने पालिकेने कर वसुलीचे २०० कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु कोरोनामुळे पालिकेने ऑगस्टपासून नागरिकांना मालमत्ताकराची बिले देण्यास सुरुवात केली. १३ ऑगस्टपासून पालिकेने प्रत्यक्ष कर वसुली सुरू केली. लॉकडाऊन काळात सर्व व्यवहार, व्यवसाय ठप्प झाले असल्याने नागरिक कर भरण्यास कसा प्रतिसाद देतील, असा प्रश्न केला जात होता. परंतु नागरिकांनी गेल्या पाच महिन्यांत तब्बल १०० कोटी रुपयांची रक्कम पालिका तिजोरीत करापोटी जमा केली आहे.

शुक्रवारपर्यंत १०० कोटी ९३ लाख ९० हजार रुपये कर वसूल केला आहे. यात मालमत्ता करासह अग्निशमन, शिक्षण, वृक्ष, रोजगार हमी, मलप्रवाह सुविधा लाभ कर, घनकचरा शुल्क तसेच व्याजाची रक्कमसुद्धा समाविष्ट आहे. रोख वा धनादेशाने ७३ कोटी ३६ लाख ६६ हजार तर ऑनलाइन २७ कोटी ५७ लाख २३ हजार कर जमा झाला आहे. नागरिकांना कर भरणे सोयीचे व्हावे म्हणून आयुक्तांनी सुटीच्या दिवशी म्हणजेच शनिवार, रविवारीही कर स्वीकारण्याची केंद्रे सुरू ठेवली आहेत. मार्च अखेरपर्यंत ही केंद्रे सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. थकबाकीदारांनी कर न भरल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. ही कारवाई  टाळण्यासाठी थकबाकीदारांनी कर भरावा असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

५० टक्के कर सवलत फसवी?

सत्ताधारी भाजपने नागरिकांना मालमत्ताकरात ५० टक्के सवलत तर थकीत व्याजाची रक्कम पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु प्रशासनाने मालमत्ताकरात २० ते २५ टक्केच सवलत देण्याची भूमिका घेतली. नागरिकांनी कर भरला पण सत्ताधाऱ्यांनी अजूनही ५० टक्के कर सवलत दिली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर