शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील टावरे स्टेडियम झाले स्वच्छ...लोकमतच्या बातमीची प्रशासनाने घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 15:29 IST

दै. लोकमतच्या या बातमीची दखल भिवंडी मनपाचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी घेतल्याने अवघ्या दोनच दिवसात टावरे स्टेडियम स्वच्छ करण्यात आले आहे

नितिन पंडीत

भिवंडी - शहरातील धोबी तलाव परिसरात शहराच्या मध्यभागी असलेल्या स्वर्गीय परशुराम धोंडू टावरे स्टेडियमच्या सुरक्षे बरोबर स्वच्छतेकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होते.मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षीत कारभारामुळे स्टेडियमच्या पेव्हेलियन मध्ये गर्दुल्ल्यांनी ठाण मांडत दारूच्या पार्ट्या व गुटखा तंबाखूची पाकिटे फेकून दिल्याने याठिकाणी गुटखा तंबाखूच्या रिकाम्या प्लास्टिक कागदांचा व दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पवेलियनमध्ये पडला होता. त्याचबरोबर पवेलियन मधील स्वच्छतागृहांची देखील अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. या संदर्भात दैनिक लोकमतने दिनांक २९ जुलै रोजी टावरे स्टेडियम बनला गर्दुल्ल्यांचा अड्डा, या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती.

दै. लोकमतच्या या बातमीची दखल भिवंडी मनपाचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी घेतल्याने अवघ्या दोनच दिवसात टावरे स्टेडियम स्वच्छ करण्यात आले आहे. विशेष म्हणजे टावरे स्टेडियमवर पोलीस भरती व सैन्य भरती , व्यायामासाठी तसेच चालण्यासाठी अनेक नागरिक या स्टेडियमवर येत असतात मात्र स्टेडियमवरील अस्वच्छतेमुळे भावी सैनिकांना व व्यायामपटूंना घाणीचा प्रचंड त्रास होत होता. याबाबत लोकमतने दिलेल्या बातमी नंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले व स्टेडियमची स्वच्छता केली आहे. दै. लोकमतच्या बातमीमुळे झालेल्या स्टेडियमच्या स्वच्छतेमुळे स्टेडियमवर सरावासाठी येणाऱ्या तरुणांमध्ये आनंद व उत्साह असून त्यांनी लोकमत परिवाराचे जाहीर आभार मानले आहेत.

टॅग्स :thaneठाणेMuncipal Corporationनगर पालिका