शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

महिनाभर आधीच रानभाज्यांचा आस्वाद; कोरोनात प्रतिकारशक्ती वाढविण्यात फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 07:44 IST

कोरोनाकाळात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पतींच्या सेवनाचे महत्त्व वाढले आहे. गुळवेल, गवती चहा, पुदिना अशा नानाविध गुणधर्म असलेल्या औषधी वनस्पतींचा वापर वाढला आहे.

बोर्डी : चक्रीवादळासह आलेल्या पावसाने ग्रामीण भागात वेळेपेक्षा महिनाभर आधीच रानभाज्या उगवल्या आहेत. आहारातील रानभाज्यांच्या सेवनाने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लाभ होतो. कोरोनाकाळात त्या बहुमूल्य असल्याने निसर्गाने ही किमया घडविल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.कोरोनाकाळात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पतींच्या सेवनाचे महत्त्व वाढले आहे. गुळवेल, गवती चहा, पुदिना अशा नानाविध गुणधर्म असलेल्या औषधी वनस्पतींचा वापर वाढला आहे. मान्सूननंतर रानमाळांवर या रानभाज्यांची उगवण होते. मात्र, चक्रीवादळामुळे चांगला पाऊस झाल्यानंतर गेल्या काही दिवसांत रानभाज्या उगवल्या आहेत. त्या खाण्याची संधी कोरोनाकाळात उपलब्ध झाली आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नागरिकांनी या भाज्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ प्रा. विलास जाधव यांनी केले आहे.शेवली, कोळी, टाकळा, रानकेळी, सुरण अशा नानाप्रकारच्या रानभाज्या उगवल्या आहेत. त्या औषधी असून, विपुल प्रमाणात खनिजे, जीवनसत्त्वे असतात. डहाणूच्या कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे दरवर्षी रानभाज्यांचे प्रदर्शन आणि पाककृती स्पर्धा आयोजित केली जाते. चेन्नई येथील स्वामीनाथन फाउंडेशनच्या सहकार्याने परसबागेत अंबाडी, चवळाई, माठ, करटोली, कुर्डू, आदी रानभाज्यांचे संवर्धनही केले जाते. डहाणूतील झारली, किन्हवली या आदिवासी गावांमध्ये परसबागांची प्रात्यक्षिके आयोजित केली जातात. २५० आदिवासी कुटुंबांना प्रशिक्षण कोसबाड कृषी विज्ञान केंद्राने गेल्या वर्षी पालघर जिल्ह्यातील २५० आदिवासी कुटुंबांना विविध रानभाज्यांच्या संवर्धनाबाबत प्रशिक्षण दिले. डॉ. एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली सकस आहार बाग उपक्रमाद्वारे रानभाज्यांचे संवर्धन सुरू आहे. त्यांच्या सेवनाने कुपोषण निर्मूलनात मदत झाली. जिल्ह्यातील २५० शेतकऱ्यांच्या शेतावर सकस आहार प्रात्यक्षिक आयोजित केले जाणार आहे.रानभाज्या औषधी गुणधर्मयुक्त असतात. त्यांच्या आहारातील सेवनाने शरीरात रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि हे कोविडकाळात उपयुक्त ठरणार आहे.- प्रा. रूपाली देशमुख, गृहविज्ञान शास्त्रज्ञ, कोसबाड कृषी विज्ञान केंद्र. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या