शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदचा हस्तक तारिक परवीनला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 17:49 IST

प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्त्वातील खंडणी विरोधी पथकाने गुरूवारी उशिरा रात्री दाऊद इब्राहिमचा विश्वासू साथीदार तारिक परवीन याला २0 वर्षांपूर्वीच्या मुंब्रा येथील एका खून प्रकरणामध्ये अटक केली.

ठळक मुद्देमुंबईत ठोकल्या बेड्यामुंब्रा येथील खून प्रकरणामध्ये होता फरार१ मेपर्यंत पोलीस कोठडी

ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक तारिक परवीन याला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने गुरूवारी रात्री मुंबईतून अटक केली. २0 वर्षांपूर्वी मुंब्रा येथे झालेल्या एका खून प्रकरणामध्ये तो फरार होता.साधारणत: २0 वर्षांपूर्वी केबल व्यवसाय तेजीत होता. या व्यावसायिक स्पर्धेतून ३१ आॅगस्ट १९९८ रोजी मुंब्रा येथील केबल व्यावसायिक मोहम्मद सिद्दीकी मोहम्मद उमर बांगडीवाला यांचा भाऊ मोहम्मद इब्राहिम यांची एका टोळीने गोळ्या झाडून हत्या केली होती. एक गोळी रोशन आरा नावाच्या १३ वर्षाच्या मुलीला चुकून लागल्याने तीदेखील जखमी झाली होती. मुंब्रा पोलिसांनी याप्रकरणी तारिक परवीनसह सात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. तारिक वगळता सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटकादेखील केली होती. या प्रकरणाच्या आरोपपत्रामध्ये तारिक परवीनला फरार दाखविण्यात आले होते. या घटनेला जवळपास २0 वर्षे उलटल्यानंतर ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने गुरूवारी रात्री १२.३0 वाजताच्या सुमारास तारिकला मुंबईतील एल.टी. रोडवरील अशोका शॉपिंग सेंटरमधून अटक केली. गेल्या काही वर्षांपासून तो रियल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्रात कार्यरत होता. मुंबई पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अशोका शॉपिंग सेंटरमध्ये त्याने कार्यालय थाटले होते. खंडणी विरोधी पथकाने त्याला मुंब्रा पोलिसांच्या स्वाधीन केले. खुनाच्या गुन्ह्यामध्ये ठाणे न्यायालयाने त्याला १ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे आणि विकास घोडके, पोलीस उपनिरीक्षक हेमंत ढोले, विकास बाबर, विलास कुटे, संदेश गावंड, प्रशांत भुरके यांनी ही कामगिरी केली.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrimeगुन्हा