शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
3
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
4
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
5
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
6
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
7
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
8
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
9
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
10
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
11
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
12
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
13
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
14
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
15
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
16
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
17
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
18
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
20
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?

दिव्यातील रस्ता रुंदीकरणावरुन भाजपाचा शिवसेनेवर निशाना, प्रशासनाचा केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 16:37 IST

दिव्यातील रस्ता रुंदीकरणाचे प्रकरण आता आणखी तापले आहे. यामध्ये भाजपा विरुध्द शिवसेना असा सामना रंगला आहे. शिवसेनेवर निशाना साधत भाजपाने प्रशासनावर आगपाखड करीत आधी पुनर्वसन करा, मगच रुंदीकरण करा असा नारा दिला आहे.

ठळक मुद्देआधी पुनर्वसन मग करा रुंदीकरणरस्ता रुंदीकरणाचा मुद्दा तापला

ठाणे - दिवा स्टेशन रोड रस्त्याच्या रु दीकरणात बाधित होणाऱ्या इमारतींमधील रहिवासी व व्यापाऱ्यांना नोटिसा न देता इमारत खाली करण्याच्या महापालिका प्रशासनाच्या धोरणावरून भाजपाने सत्ताधारी शिवसेनेवर रहिवाशांच्या आडून निशाणा साधला आहे. यानुसार रविवारी घेतलेल्या एका निर्धार सभेत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आधी पुनर्वसन आणि नंतरच रास्ता रु ंदीकरण अशी आक्रमक भूमिका घेऊन दडपशाही पद्धतीने कारवाई करणाºया मनपा प्रशासनाचा निषेध करून रस्त्यावर उतरून विरोध केला जाईल, इशारा देऊन शिवसेनेला टार्गेट केले.                   या सभेला भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड व दिवा विभाग अध्यक्ष अ‍ॅड.आदेश भगत, कागती युवक संघटनेचे अध्यक्ष गोविंद भगत, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चेतन पाटील, सरचिटणीस रोहिदास मुंडे यांनी उपस्थित बाधित रहिवासी व व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर भाजपा युवा मोर्चा ठाणे शहर अध्यक्ष निलेश पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.*शिवसेना नगरसेवकावर आरोपआगासन रस्ता जंक्शन ते दिवा पूर्व स्टेशन येथील रस्त्याचे ६० मीटर रु ंदीकरणाचा व रस्ता बांधणीचा ठराव नुकत्याच झालेल्या महासभेत मंजूर झाला असून महापालिकेने सर्व इमारती खाली करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, बाधित होणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांना याची कोणतीही लेखी सूचना आजतागायत दिलेली नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. रहिवाशांना अंधारात ठेऊन व पुनर्वसनाची कोणतीही लेखी हमी न देता मनपा अधिकारी हे रुंदीकरण करण्याच्या हेतूने काम करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांना हाताशी धरून जबरदस्तीने इमारत खाली करण्यासाठी गरीब रहिवाशांवर दबाव निर्माण केला जात आहे. अधिकारी वर्ग व नगरसेवक कोणत्याही वेळी इमारतीत येऊन इमारत खाली करा म्हणून रहिवाशांना धमकावत आहेत, असे गंभीर आरोप करून भाजपाने रस्ता रुंदीकरणावरून यावेळी शिवसेनेला आरोपीच्या पिंजºयात उभे केले.* राज्यमंत्री रहिवाशांच्या पाठिशीबाधित होणाऱ्या रहिवाशांना आणि व्यापाऱ्यांना कायमस्वरूपी पुनर्वसनाची लेखी हमी मिळाल्याशिवाय इमारत खाली करणार नाही. दिव्यातील रस्ता रु ंदीकरण बधितांच्या पाठीशी असल्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. तर हा विषय सुरू असलेल्या अधिवेशनात घेणार असल्याचे भाजपा आमदार संजय केळकर यांनी सांगितले. त्यामुळे ठाणे महापालिका आता काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाBJPभाजपा