शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

टँकरचीही होतेय पळवापळवी

By admin | Updated: April 7, 2016 01:17 IST

कल्याण-डोंबिवलीतील पाणीप्रश्न तीव्र होत असतानाच सोसायट्यांनी पैसे भरून बुक केलेले टँकरही गायब होऊ लागल्याने पाण्याचा काळाबाजार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे

मुरलीधर भवार,  कल्याणउल्हासनगरपाठोपाठ कल्याण-डोंबिवलीतील पाणीप्रश्न तीव्र होत असतानाच सोसायट्यांनी पैसे भरून बुक केलेले टँकरही गायब होऊ लागल्याने पाण्याचा काळाबाजार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. संख्या तिप्पट करूनही टँकरची पळवापळवी सुरू असल्याने वेटिंग लिस्ट सतत वाढते आहे. वेळेत आणि पुरेसे पाणी मिळत नसल्याने बाटलीबंद पाण्याची मागणी वाढली आहे. त्यांचे दरही अचानक वाढले आहेत. प्रसंगी तोटा सोसून महापालिका टंचाईग्रस्त भागाला माफक दरात टँकरद्वारे पाणी पुरवते. डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगरमधील जय त्रिरूप सोसायटीने फेब्रुवारीत पैसे भरून बुक केलेल्या चार टँकरपैकी अवघे दोनच टँकर त्यांना मिळाले. त्यापैकी दोनच टँकर सोसायटीने पाठपुरावा केल्यावर दिले गेले. उर्वरित दोन टँकर अद्याप सोसायटीला पुरविले गेलेले नाही. हे पाणी कोणी पळवले, असा सवाल सोसायटीचे सचिव रवींद्र नेहरकर यांनी केला.याबाबत, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा म्हणाले, सोसायटीने पाठपुरावा केला नसेल, तर त्यांना टँकर मिळाला नसेल. मागणी जास्त आहे म्हणून एकाचा टँकर दुसऱ्याला दिला जात नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. टँकर वाढणार३० टक्के पाणीकपातीनंतर खाजगी कंत्राटदारांचे १५ टँकर लावण्यात आले होते. पालिका खाजगी कंत्राटदाराला पाच फेऱ्यांचे दोन हजार ३४० रुपये मोजते. पण, नागरिकांकडून एका टँकरचे ३२० रुपये घेतले जातात. टंचाई भीषण झाल्याने आणखी १५ टँकर वाढवण्यात आले आहेत. तेही कमी पडून लागल्याने १५ टँकर वाढवले जाणार आहेत. >पाण्याचा काळाबाजार : भार्इंदर : शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सरकारकडून अतिरिक्त पाणीपुरवठा होत आहे. परंतु, या अतिरिक्त पाण्याचा पालिकेच्या कंत्राटावर असलेले टँकरवाले नागरिकांच्या वाट्याचे पाणी काळ्याबाजारात खाजगी टँकरवाल्यांना खुलेआम विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. यापूर्वीही पाणीटंचाईची झळ शहराला बसली असतानाच वरसावे येथील जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधील गळतीचा गैरफायदा घेणाऱ्या पाणीमाफियांची चोरी उघड झाली होती. > पाण्याच्या दोनच तक्रारी ठाणे : पाण्यासंदर्भातील अडचणी किंवा तक्रारींबाबत ठाणे जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी सुरू केलेल्या १०७७ या टोल फ्री क्रमांकावर पहिल्याच दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत दोनच तक्रारी आल्या. यामध्ये ठाणे शहरातून एक तर दुसरी नवी मुंबईतून आली आहे. सर्वत्र पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच, ठाणे जिल्ह्यातील विविध जलसाठ्यांतील पाणीसाठा हा अत्यल्प आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत वेगळ्या स्वरूपात पाणीकपात करण्यास सुरुवात केली आहे.