शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

फारकत घेतलेले मेटे पुन्हा भाजपासोबत

By admin | Updated: June 16, 2017 02:07 IST

आघाडीतून युतीत सहभागी झालेल्या पुढे मराठा मोर्चा, शिवस्मारक आणि मंत्रीपदावरून नाराज होत भाजपापासून फारकत घेतलेल्या विनायक मेटे

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : आघाडीतून युतीत सहभागी झालेल्या पुढे मराठा मोर्चा, शिवस्मारक आणि मंत्रीपदावरून नाराज होत भाजपापासून फारकत घेतलेल्या विनायक मेटे यांनी मीरा-भार्इंदर पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला चांगल्या कामाचे प्रशस्तीपत्र दिले आहे आणि भाजपासोबत पालिका निवडणूक लढवण्याची तयारीही दर्शवली आहे. आमची संग्राम परिषद स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. पण भाजपाने प्रतिसाद दिल्यास त्यांच्यासोबतही लढण्याची तयारी असल्याचे परिषदेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी गुरुवारी मीरा रोडच्या जीसीसी येथील पत्रकार परिषदेत जाहीर केले. मेटे यांच्या सतत बदलणाऱ्या भूमिकेवर छेडले असता त्यांनी भाजपा चांगले काम करीत आहे. त्यामुळे आम्ही राजकारणासाठी न भांडता समाजकारणाच्या माध्यमातून निवडणूक लढविणार असल्याचे तत्वज्ञान मांडले. या निवडणुकीत भाजपाला शिवसेनेचा पाडाव करता यावा यासाठी शिवसंग्राम परिषदेच्या माध्यमातून मते फोडण्याचा डाव आहे का, असे विचारताच त्यांनी तसे नसल्याचे सांगत प्रश्नाला बगल दिली. या पत्रकार परिषदेला संग्राम परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सुबोध मोहिते, शिवसंग्राम परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, मुंबई अध्यक्ष दिलीप माने आदी पदाधिकारी उपस्थित होते. ‘नेतृत्त्वहीन ठरल्यानेच मराठा मोर्चे फसले’आरक्षणाच्या मागणीसाठी काढलेले मराठा क्रांती मोर्चे नेतृत्वहीन ठरल्याने प्रभावी ठरले नाहीत. मात्र भारतीय संग्राम व शिवसंग्राम परिषदेने यासाठी मोठे कार्य केल्याचा मेटे यांचा दावा आहे. धनगर व मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. भाजपाध्यक्ष अमित शहा हे उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याने सेना सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचा दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांना वेतन द्या!राज्यातील शेतकऱ्यांना दरमहा दोन हजार रुपये वेतन, मोफत आरोग्य सेवा, दैनंदिन कामाच्या हमीचा कायदा आदी मागण्या परिषदेने केल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफीचा निर्णय स्वागतार्ह आहे. पण सरकारने सत्तेतील सर्व घटक पक्षांशी चर्चा करुन कर्जमाफीचा तपशील जाहीर करावा, अशी पुस्ती त्यांनी जोडली. सरकारने शेतकऱ्यांना १० हजारांची मदत जाहीर केली असली, तरी ती देण्यात बँका अडवणूक करत आहेत. अशा बँकांवर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. असा झाला अन्याय...२०१४ मध्ये पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी आघाडीतून बाहेर पडून मेटे युतीत सामील झाले. भाजपाने विधानसभा निवडणुकीत पाच जागा देण्याचे मान्य केले. त्यातील दोनच जागा दिल्या. त्यात मुंबईतील एका जागेवर परिषदेचा उमेदवार निवडून आला. तेव्हा भाजपाने मंत्रिमंडळात माझा समावेश करण्यासह महामंडळावरील नियुुक्तीबाबत आश्वासन दिले. मात्र त्यांनी घुमजाव केल्याने माझ्यावर अन्याय झाल्याची खंत मेटे यांनी व्यक्त केली. त्यामुळे संग्राम परिषदेने अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवित यश मिळवले. मीरा-भार्इंदरमध्ये भाजपासोबत निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपाने आश्वासने न पाळल्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच मेटे यांनी त्यांच्यासोबत जाण्याचा पवित्रा घेतला. याबाबतची बातमी ‘लोकमत’ने १३ जूनच्या अंकात प्रसिद्ध केली होती.