शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी 'या' उपाययोजना करा; महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश 

By अजित मांडके | Updated: July 9, 2024 14:46 IST

शाळांमध्ये जागृती उपक्रमाचे आयोजन करण्याची केली सूचना.

अजित मांडके (ठाणे), लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मूर्तीकार संघटना, स्वयंसेवी संस्थाची मदत घ्यावी, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. या सगळ्यांच्या सहकार्याने हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्याकडे आपण मार्गक्रमण करू शकतो, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य सरकार, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दिलेल्या निर्देशानुसार आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव नियमावली-२०२४ मार्च महिन्यात प्रसिद्ध केली आहे. सर्व मूर्तीकार, मूर्ती विक्रेते यांना त्यासंदर्भात माहिती दिली आहे. त्याबाबत पर्यावरण क्षेत्रातील संस्था व तज्ज्ञ आणि पारंपरिक मूर्तिकार संघटना यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे. हे प्रयत्न असेच सुरू ठेवून जास्तीत जास्त संवाद साधला जावा, असे आयुक्त राव यांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत स्पष्ट केले.महापालिकेतील विभागप्रमुखांची आढावा बैठक सोमवारी सायंकाळी नागरी संशोधन केंद्र येथे झाली. या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पर्यावरण विभागाने सक्रियपणे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी अधिकाधिक उपक्रम करावेत. महापालिकेच्या शाळा आणि इतर शाळांमध्ये एकाच दिवशी त्यासंदर्भात उपक्रमाचे आयोजन करावे. त्यात नाटिका, स्पर्धा, रांगोळी अशा कोणत्याही स्वरुपात विद्यार्थी आणि शिक्षक यांना व्यक्त होण्याची मोकळीक द्यावी. या उपक्रमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घरोघरी जाईल. तसेच, भविष्यातील नागरिकांच्या मनात त्याविषयी आत्मियता निर्माण होईल. त्यादृष्टीने पर्यावरण विभाग, शिक्षण विभाग यांनी नियोजन करावे, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, गणेशोत्सव मंडळांची संघटना, मूर्तीकारांची संघटना यांना एकत्र आणून त्यातून हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक होण्याच्या मार्गातील समस्या, अडचणी जाणून घ्याव्यात. म्हणजे त्यावर तोडगा काढता येईल, असेही आयुक्त राव म्हणाले.कांदळवनावरील भरावाबाबत आक्रमक व्हाकोलशेत–बाळकूम परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनीलगत कांदळवनावर भराव टाकण्यात आला आहे. या भागाची पाहणी केल्यानंतर तेथे मोठी वाहने जाऊ नयेत यासाठी चर खणण्यात आले आहेत. कांदळवनाच्या संवर्धनाबाबत फलक लावण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेनेही मोठी वाहने या भागात प्रवेश करू नयेत याची उंच वाहन अवरोधक बसवले आहेत. आता हा भराव काढून टाकण्याची कारवाई ठाणे महापालिका करणार आहे. वन विभाग आणि महसूल विभाग यांच्याशीही येथील परिस्थितीबाबत पत्र व्यवहार करण्यात आला आहे.कांदळवनावरील हा भराव काढून टाकण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेने आक्रमक व्हावे. आपल्या कृतीतून या संवेदनशील विषयाबाबत महापालिकेची आक्रमक भूमिका दिसली पाहिजे. त्यासाठी येत्या तीन दिवसात आतापर्यंत झालेली कारवाई आणि पुढील तीन महिन्यात करायचा कृती आराखडा सादर करावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापन विभागास दिले.स्वाईन फ्लूबद्दल सतर्क रहावेठाणे महापालिका क्षेत्रात, जूनपासून स्वाईन फ्लूच्या (एचवनएनवन) रुग्णांची संख्या ७० इतकी आहे. गतवर्षी या आजाराचे रुग्ण कमी होते, परंतु स्वाईन फ्लूच्या (एचथ्रीएनटू) रुग्णांची संख्या ८७ होती. ही संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी. औषधांची उपलब्धता ठेवावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या रुग्णासाठी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड तयार केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

टॅग्स :thaneठाणे