शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

हत्या, आत्महत्या प्रकरणात तत्काळ कारवाई करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 02:32 IST

बदलापूरची घटना; महिला आयोगाने घेतली दखल

बदलापूर : बदलापूर येथील आठ वर्षीय मुलीची हत्या व तिच्या आईची आत्महत्या प्रकरणात पोलिसांकडून होत असलेल्या अन्यायाची राज्य महिला आयोगाने स्वत:हून गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात तत्काळ कारवाई करण्याचे आदेश आयोगाने ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत. ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेऊन आयोगाने हे आदेश दिले आहेत.फ्लॅटसह विविध कारणांसाठी सतत पैशाची मागणी तसेच घटस्फोट द्यावा यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून मीना पाटील या विवाहितेने आठ वर्षांच्या मुलीचा चाकूने गळा चिरून स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना बदलापूर येथे १० जून रोजी रात्री ११ वाजता घडली. या घटनेला मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेला पती व सासू जबाबदार असून त्यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा यासाठी मीना हिच्या वडिलांनी मंगळवारी ठाणे, अंबरनाथ व बदलापूर येथे पोलीस अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली. मात्र पोलिसांनी टोलवाटोलवी करून मीना यांच्या वडिलांचा जबाब लिहून घेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे टाळले. हा जबाब महत्त्वाचा असून त्याआधारे पुढील कारवाई करू, असे सांगून नातेवाइकांची बोळवण केली. या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कुळकर्णी यांना विचारले असता, हे प्रकरण माझ्याकडे आहे. मुलीच्या वडिलांना सर्व गोष्टी सविस्तर समजावून सांगण्यात आल्या आहेत, आपण त्यांच्याकडूनच माहिती घ्यावी, असे त्यांनी सांगितले. मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी दिलेली आहे; मात्र आपण गुन्हा का दाखल केला नाही, या प्रश्नावर बोलणे मात्र त्यांनी टाळले. एकंदरीतच या प्रकरणात मीना हिचे पती अशोक पाटील पोलीस दलात असल्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न बदलापूर पोलिसांकडून केला जात असल्याचा आरोप वडील दिलीप पाटील यांनी केला.राज्य महिला आयोगाच्या समुपदेशक सुनीता गणगे यांनी पोलीस अधिकाºयांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, सदर प्रकरण गंभीर असून आयोगाने स्वत:हून त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तत्काळ योग्य ती कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल महिला आयोगास सादर करावा, असे आदेश दिले आहेत.