शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

यापुढील निवडणुका मतपत्रिकेवरच घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 03:28 IST

अगदी प्रगत देशांमध्येही मतपत्रिकांवर मतदान केले जाते. मग आगामी लोकसभा निवडणुका या मतपत्रिकेवर घ्यायला काय हरकत आहे, असा सवाल करून निवडणूक आयोगानेही ईव्हीएम मशिनचा आग्रह धरू नये.

ठाणे : अगदी प्रगत देशांमध्येही मतपत्रिकांवर मतदान केले जाते. मग आगामी लोकसभा निवडणुका या मतपत्रिकेवर घ्यायला काय हरकत आहे, असा सवाल करून निवडणूक आयोगानेही ईव्हीएम मशिनचा आग्रह धरू नये. भाजपा आग्रह धरत असेल तर निवडणुकाच न घेतलेल्या बऱ्या, अशा शब्दात राष्टÑवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी ईव्हीएम मशिनच्या घोटाळ्याबाबत होणाºया आरोपांना मंगळवारी आपलाही पाठिंबा दिला.कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीनंतर अनेक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी हा ईव्हीएम मशिनचा विजय असल्याची खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यावर भाष्य करतांना पाटील यांनी हे मत मांडले. राष्टÑवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच त्यांनी ठाण्यातील पदाधिकाºयांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी एक औपचारिक बैठक मंगळवारी सायंकाळी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी घेतली. तत्पूर्वी, पत्रकारांशी बोलतांना त्यांनी आपले हे मत प्रदर्शित केले. कर्नाटकात आपणही निवडणूक काळात गेलो होतो, तिथे सामान्य माणसे किंवा शेतकºयांनीही सरकारचे काम चांगले असल्याबद्दल दाद दिली होती. काँग्रेस विरोधात बोलतांना कोणी आढळले नाही. काँग्रेसचे काम चांगले असतांना, असा निकाल लागणे अनपेक्षित असल्याचेही ते म्हणाले. अगदी काही राज्यांत तर संख्याबळ नसतांनाही काही सदस्यांच्या मदतीने छोट्या पक्षांची मोडतोड करून भाजपने सत्ता स्थापन केली आहे. मुळात, कुठेही सत्ता येण्यासाठी पूर्ण बहुमत असणे गरजेचे आहे. तसे झालेले नाही. भाजपाची लाट ओसरली आहे. त्यामुळे आतापासूनच काँग्रेस राष्टÑवादी काँग्रेस एकत्र निवडणुका लढविण्यासाठी कार्यरत झाले आहेत. कळवा मुंब्रा प्रमाणे ठाणे शहरातही राष्टÑवादी वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातील, लोकांची मनेही जिंकणार असेही ते म्हणाले. कोकण पदवीधर मतदार संघात काँग्रेस राष्टÑवादीने सर्वाधिक नोंदणी केली आहे. पाकिस्तानातून केंद्राने साखर आयात केलेल्या धोरणावरही त्यांनी सडकून टीका केली.>पक्षांतर्गत नाराजी शमविण्यासाठी डावखरे यांच्यासह विविध पदाधिकाºयांशी चर्चाकोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेना किंवा भाजपातून आमदार निरंजन डावखरे हे निवडणूक लढवतील, अशी एक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. त्याचा डावखरे यांनी मात्र इन्कार केला आहे. एकीकडे कळवा मुंब्रा या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघातही त्यांच्याच पक्षाचे मंदार केणी यांनी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर निरंजन डावखरे तसेच मुकुंद आणि प्रमिला केणी हे नगरसेवक दाम्पत्य त्यांचा मुलगा मंदार यांच्यासह शहराध्यक्ष आनंद परांजपे, नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे अशा अनेक मंडळींशी आव्हाड यांच्या मध्यस्थीने पत्रकार परिषदेनंतर जयंत पाटील यांनी उमेदवारीबाबत गुप्तगू केले.पालघरमध्ये दामू शिंगडा विजयी होतील..: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत दिवंगत खासदार चिंतामण वनगांच्या मुलाला उमेदवारी देण्याची भाजपची मानसिकता नव्हती. त्यात गावितांनीही गद्दारी करून भाजपातून प्रवेश मिळविला. मात्र, काँग्रेस-राष्टÑवादीचे उमेदवार दामू शिंगडा हेच तिथे बाजी मारतील, असा दावाही पाटील यांनी केला. तसेच बीडमध्ये जगदाळे हेच राष्टÑवादीचे उमेदवार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटील