शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खूनाची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 21:28 IST

माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून विचित्र त-हेने ट्रोल केले जात आहे. अगदी एन्काऊंटर करुन खूनाची धमकी दिली जात आहे. याशिवाय, पंतप्रधानांसह भाजपाच्या नेत्यांची बदनामी करणा-यांवरही कडक कारवाई केली जावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मंगळवारी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देविरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे ठाण्याच्या पोलीस आयुक्तांकडे मागणीपंतप्रधानांसह भाजपाच्या नेत्यांचीबदनामी करणाऱ्यांवरही कारवाईची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या प्रमुख नेत्यांविरुद्ध सोशल मिडियातून सुरू असलेल्या बदनामीबरोबरच राज्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या दबावाखाली भाजपाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे आणि अत्याचार केले जात आहेत. तसेच फडणवीस यांनाही खूनाची धमकी दिली जाते, अशा विकृतांवर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मंगळवारी सायंकाळी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे.दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे मुंबई शहराध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार संजय केळकर आणि ठाणे शहराध्यक्ष आणि आमदार निरंजन डावखरे यांनी फणसळकर यांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पोलिसांकडून होणारे अत्याचार थांबविण्याबरोबरच बदनामी करणा-या समाजकंटकांविरुद्ध कडक कारवाई केली जावी. संकटकालीन परिस्थितीमध्ये सोशल मिडियाच्या माध्यमातून वातावरण गढूळ होऊ नये, यासाठी दक्षता घेतली जावी, असे आवाहनही दरेकर यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यासह भाजपाच्या प्रमुख नेत्यांविरोधात फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अश्लील भाषेत तसेच चित्राच्या माध्यमातून मारहाणीच्या अगदी इन्काऊंटर करुन खूनाच्या धमक्या दिल्या जातात. धर्म आणि देव देवतांची टिंगलटवाळी, साधू-संतांविषयी अत्यंत हिन मजकूर सोशल मिडियातून पसरविला जात आहे. मात्र, त्याविरोधात पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. त्याउलट, भाजपाच्या कार्यकर्त्यांवर खोटया तक्रारी दाखल करु न त्यांना मारहाण करु न दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला आहे. महाविकास आघाडीतील मंत्री, आमदार यांच्याकडून ठाणे आयुक्तालयातील पोलीस अधिका-यांवर दबाव आणला जातो. त्यानंतर भाजपा तसेच अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांना घरातून उचलून नेऊन मारहाण केली जात आहे. त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केले जातात. या संदर्भात चौकशी करावी, अशी मागणीही दरेकर यांनी यावेळी आयुक्तांकडे केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSocial Viralसोशल व्हायरल