शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

"अवैध रेती उपसा करणारे डेझर व सक्शन पंपवर कारवाई करा",खा.बाळ्या मामा यांची मागणी

By नितीन पंडित | Updated: December 24, 2024 15:48 IST

Bhiwandi News: रेती माफियांकडून डेजर व सक्षम पंपाच्या साह्याने राजरोसपणे अवैध रेती उपसा होत असल्याने अवैध रेती उपसा करणाऱ्या डेजर व सक्षम पंपवर महसूल विभागाने कारवाई करावी अन्यथा स्थानिक भूमिपुत्र या डेजर व सक्षम पंप वर कारवाई करतील असा इशारा भिवंडी लोकसभेचे खा. सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी महसूल यंत्रणेला दिला आहे.

- नितीन पंडित भिवंडी - भिवंडीतील खाडीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा होत असून रेती माफियांकडून डेजर व सक्षम पंपाच्या साह्याने राजरोसपणे अवैध रेती उपसा होत असल्याने अवैध रेती उपसा करणाऱ्या डेजर व सक्षम पंपवर महसूल विभागाने कारवाई करावी अन्यथा स्थानिक भूमिपुत्र या डेजर व सक्षम पंप वर कारवाई करतील असा इशारा भिवंडी लोकसभेचे खा. सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी महसूल यंत्रणेला दिला आहे. मंगळवारी खा. म्हात्रे यांनी तहसीलदार अभिजीत खोले यांची भेट घेऊन या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी तालुक्यातील तांडेल मंडल व डुबी मारून रेती काढणारे व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भिवंडीतील खाडीपात्राच्या किनारी असलेल्या गावांमध्ये डुबी मारून रेती काढण्याचा व्यवसाय अनेक वर्षांपासून सुरू होता.मात्र शासनाच्या महाराष्ट्र सागरी मंडळ ( मेरीटाइन बोर्ड)कडून नियमांची पायमल्ली करून डुबी मारून रेती उत्खनन करणे बंद करून डेजर व सक्षम पंपच्या माध्यमातून रेती उत्खनन करण्यास परवानगी दिल्याने तालुक्यातील हजारो स्थानिक भूमिपुत्र व डुबी मारून रेती काढणाऱ्या व्यावसायिकांचे पारंपरिक व्यवसाय बंद झाला असून अनेक भूमीपुत्रांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे मत यावेळी खा.म्हात्रे यांनी व्यक्त करत सोमवारी तांडेल मंडळाने थेट नागले खाडीपात्रात या विरोधात केलेल्या आंदोलनात आपण स्वतः सहभागी झालो होतो,या स्थानिक नागरिकांना न्याय देण्यासाठी आपण सर्व कायदेशीर लढाया लढणार असून मागील अनेक वर्षांपासून खाडीपात्रात डेझरच्या माध्यमातून अवैधपणे रेती उपसा सुरू आहे, मात्र महसूल विभाग त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील यावेळी खा.बाळ्या मामा यांनी करत महसूल यंत्रणेला धारेवर धरले होते.

यासंदर्भात शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीतून मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन भिवंडी तहसीलदार अभिजीत खोले यांनी खा. बाळ्या मामा यांना दिले. तर महसूल यंत्रणेने स्थानिक भूमिपुत्रांचा व रेती व्यावसायिकांचा अंत पाहू नये, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत योग्य मार्ग निघाला नाही तर आम्ही स्वतः डेजर व सक्षन पंपवर कारवाई करू असा इशारा यावेळी खा. बाळ्या मामा यांनी दिला आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी