शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलची दुरवस्था, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 04:44 IST

अंबरनाथ : अंबरनाथ तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालय हे प्रशासकीय इमारतीत सुरू आहे. यातील तहसीलदार कार्यालयाच्या देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या इमारतीला अनेक ठिकाणी गळती लागल्याने कर्मचाऱ्यांना काम करणेही अवघड जात आहे. त्यातच स्वच्छतागृहाच्या देखभाल दुरुस्तीकडेही दुर्लक्ष होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही त्याची कोणतीच दखल ...

अंबरनाथ : अंबरनाथ तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालय हे प्रशासकीय इमारतीत सुरू आहे. यातील तहसीलदार कार्यालयाच्या देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या इमारतीला अनेक ठिकाणी गळती लागल्याने कर्मचाऱ्यांना काम करणेही अवघड जात आहे. त्यातच स्वच्छतागृहाच्या देखभाल दुरुस्तीकडेही दुर्लक्ष होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही त्याची कोणतीच दखल घेतली जात नाही.

अंबरनाथ तालुक्याचा कारभार ज्या तहसीलदार कार्यालयातून चालवण्यात येत आहे, त्या कार्यालयात कामगारांना अनेक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. या इमारतीच्या देखभालीची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. मात्र, इमारतीच्या देखभालीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. इमारतीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे, तर काही ठिकाणी प्लास्टरही निघत आहे. असे असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. स्वच्छतागृहांची अवस्था बिकट झाली आहे. त्यांची दुरुस्ती केली जात नाही. अनेक ठिकाणी मल वाहून नेणारी वाहिनी तुटलेली आहे. पाणीपुरवठ्याच्या वाहिनीचीही दुरुस्ती होत नसल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व समस्यांबाबत तहसीलदार जयराज देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना कल्पना दिलेली आहे. मात्र, त्याकडेही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे.

इमारतीसोबत इमारतीच्या परिसराकडेही दुर्लक्ष होत आहे. इमारतीची संरक्षक भिंतही अनेक ठिकाणी तोडण्यात आलेली आहे. त्याच्या दुरुस्तीकडेही दुर्लक्ष केले जात आहे. परिसरात पाणी वाहून नेण्यासाठी तयार केलेल्या नाल्यावर लावलेली जाळीही तुटल्याने त्या ठिकाणी गाडी अडकते. अनेक गाड्यांचे चाक या नाल्यात अडकते.इमारतीच्या देखभालीबाबत सर्व कल्पना दिली आहे. इमारतीच्या दुरुस्तीसाठी कामे हाती घ्यावीत, यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग यासंदर्भात कार्यवाही करत आहे. हे काम लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे.- जयराज देशमुख, तहसीलदार, अंबरनाथ

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका